Nashik Encroachment : ग्राहकांनी वाहने पार्क करावी कुठे? रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

Nashik News : शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. मेनरोड बाजारपेठेत खरेदीसह विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांची दुचाकी पार्क करण्यास अडचण येते.
The road from Bohorpatti to Dhumal Point is controversial for vehicle parking
The road from Bohorpatti to Dhumal Point is controversial for vehicle parkingesakal
Updated on

Nashik News : शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. मेनरोड बाजारपेठेत खरेदीसह विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांची दुचाकी पार्क करण्यास अडचण येते. एखाद्या दुकानाच्या बाहेर दुचाकी उभी केल्यास दुकानदार व्यावसायिकाकडून त्यांच्याशी वाद घालून दादागिरी करतो. वारंवार अशा घडणाऱ्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहे. (Parking is big problem in city)

मेनरोड शहराचे मुख्य बाजारपेठ आहे. शहरभरातील नागरिक खरेदी करण्यासह अन्य कामानिमित्ताने येतात. दुचाकी घेऊन आलेल्या नागरिकांना त्यांची दुचाकी पार्क करण्यासाठी जागा नसते. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील व्यावसायिकासह मोठ्या दुकानदारांचे अतिक्रमण वाढलेले असते. अशा वेळी नागरिकांकडून दुकानांसमोरील फुटपाथवर दुचाकी पार्क करतात. दुकानदार वाद घालण्यास सुरवात करतो.

दुकानाच्या प्रवेशद्वार मोकळे असताना या ठिकाणी दुचाकी लावायची नाही. ही आमची जागा आहे, असे म्हणत महापालिकेच्या जागेवर प्रभुत्व गाजवत असतात. तर दुसरीकडे रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये रोज घेऊन त्यांच्याच दुकानांसमोर त्याच जागेवर महापालिकेच्या रस्त्यावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा दिली जाते.

त्या वेळी मात्र नागरिकांना त्रास देणारे स्थानिक दुकानदारांना अडचण होत नाही. अवघ्या पाच ते दहा मिनिटे दुचाकी उभी करत आहे. अशी विनंती करूनही त्या दुकानदारांकडून नागरिकांना दमदाटी करत वाहन काढण्यास सांगत असतात. बहुतांशी वेळेस त्यांच्यावर कृपादृष्टी असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्याचा दम देत असतात. (latest marathi news)

The road from Bohorpatti to Dhumal Point is controversial for vehicle parking
Nashik News : जिल्‍हा बँकेचे प्रशासक, सीईओंना ठार मारण्याची धमकी!

दैनंदिन अशा घटना मेनरोड विशेषतः धुमाळ पॉइंट ते बोहरपट्टी चौक भागात घडत असतात. धुमाळ पॉइंट परिसरातील दुकानदारांची तर चांगलीच मुजोरी वाढली आहे. सरकारवाडा पोलिस आणि महापालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असतात.

वाहन पार्किंगला जागा नसताना नागरिक वाहन उभे कुठे करणार, याची दक्षता घेत महापालिकेने याभागात अतिक्रमण मोहीम राबवावी. दुकानात समोर फुटपाथचा भाग दुचाकी पार्किंगसाठी मोकळा करून देण्यात यावा.

दुकानदारांना तंबी देत केवळ त्यांच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दुचाकी उभी करण्यास बंदी करून अन्य भागात वाहने पार्कसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. दादागिरी करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी. अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.

The road from Bohorpatti to Dhumal Point is controversial for vehicle parking
Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ आराखड्यातून 500 कोटींची कामे वगळली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.