Nashik Parking Problem : जनसहभागातून नागरिकांच्या पायाभूत सेवा-सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने शहरात फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ३२ टक्के नाशिककरांनी पार्किंगसाठी अतिरिक्त जागा हवी, तर २८ टक्के लोकांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणाची शिफारस केली आहे.
सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे सुपूर्द केला. (Nashik Parking Problem nashik people want space for parking Shiv Sena survey findings)
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम राबविला. शहरात वाहतुकीची समस्या वाढली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचे मत जाणून घेतले. त्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले.
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील, वाहतूक पोलिसांची संख्या वाढविता येईल का, वाहतूक पोलिसांची संख्या व कार्यक्षमता वाढविणे, रस्ते रुंदीकरण करणे क्रमप्राप्त आहे का, पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करणे, सम-विषम पार्किंगव्यवस्था या महत्त्वाच्या प्रश्नांवर पर्यायी उत्तर मागितले. त्यातून निष्कर्ष काढण्यात आला.
नागरिकांनी नोंदविलेले मत (टक्केवारीत)
- पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे - ३२
- रस्ते रुंद करणे - २६
- वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे - १८
- वाहतूक पोलिसांची संख्या व कार्यक्षमता वाढविणे - ११
- सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकटीकरण - १०
- ‘ऑड इव्हन डे’ला क्रमांकाच्या वाहनांना परवानगी - ३
"शिवसेनेच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल महापालिका व पोलिसांना सादर केला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी मदत केली जाईल."- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.