Nashik Parking Problem : RTO कार्यालयाबाहेरच अनधिकृत पार्किंग!

Nashik News : प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर सर्रास चारचाकी वाहन पार्किंग केली जातात
Unauthorized parking outside Regional Transport Office
Unauthorized parking outside Regional Transport Officeesakal
Updated on

पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर सर्रास चारचाकी वाहन पार्किंग केली जातात. या अनधिकृत पार्किंगमध्ये आरटीओ दलालांची बहुतेक कामे चालतात. यामुळे अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन छोटे- मोठे अपघातदेखील घडत असतात. रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार कोण, असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. यावर वाहतूक शाखा पोलिस की मनपा कारवाई करणार याकडे, लक्ष लागून राहिले आहे. (Nashik Unauthorized Parking RTO office marathi news)

दुचाकी, चारचाकी यासह माल वाहतूकदारांवर आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. यातून शासनास महसूल रुपी पैसा गोळा केला जात असतो. मात्र, याच आरटीओ कार्यालयाच्या भिंतीलगत रस्त्याच्या कडेला खासगी वाहनांमध्ये आरटीओ कार्यालयातील कामकाजासाठी लागणारे अर्ज, चलन व मेडिकल फिटनेससारखे काम केले जात आहे.

या ठिकाणी वाहनांची संख्या व त्यांच्या भोवती लावण्यात येणाऱ्या मोठ्या छत्र्या बघता लागत आहेत. आरटीओकडून अनेकदा महापालिका व शहर वाहतूक शाखा यांना या पण अनधिकृत वाहन पार्किंगबद्दल पत्र दिले असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु या आरटीओच्या पत्राला महापालिका व शहर वाहतूक विभाग यांनी कायम केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (latest marathi news)

Unauthorized parking outside Regional Transport Office
Nashik News : इटलीच्या दांपत्याचे दत्तक विधान पूर्ण! आधाराश्रमातील चिमुरडीला मिळाले हक्काचे घर अन पालकही

पत्राला केराची टोपली

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महापालिकेस व वाहतूक शाखेस या अनधिकृत पार्किंगबाबत पत्रव्यवहार केल्याचे समजते. मात्र महापालिकेकडून किंवा शहर वाहतूक शाखेकडून कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे दिवसागणिक खासगी वाहनातून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आरटीओत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून या वाहनातून व्यवसाय करणारे अधिकचे पैसे घेऊन लूट होत असल्याचा आरोपदेखील काही नागरिकांकडून केला जात आहे.

काणाडोळा का ?

प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या नागरिकास दलालाकडे जावे लागत नाही, असे म्हटले जाते. कार्यालयाच्या लगत रस्त्यावर अनधिकृत पार्किंगमध्ये ऑनलाइन अर्ज भरणे, जागेवर विमा काढून, डॉक्टर कडून लागणारे फिटनेस सर्टिफिकेट आदी प्रकारचे कामे या ठिकाणी चालत आहेत. याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून, मनपा व वाहतूक शाखा काणाडोळा करत असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये जोमात सुरू आहे.

Unauthorized parking outside Regional Transport Office
Arogyavardhini Kendra : ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रे नाशिककरांच्या सेवेत! शहर सुदृढतेच्या दिशेने वाटचाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.