German Bakery Bombing Case : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगला पॅरोल

Latest Crime News : रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात यावे लागणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून हिमायत बेग हा तुरुंगात अंडा सेलमध्ये आहे.
Himayat Beg
Himayat Begesakal
Updated on

नाशिक : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगला नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ४५ दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. त्या संबंधित कागदपत्र व जामीनदारांची पूर्तता झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर त्याला चार दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातून मुक्त करण्यात आले. रजेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात यावे लागणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून हिमायत बेग हा तुरुंगात अंडा सेलमध्ये आहे. (Parole to Himayat Beg accused in German Bakery Bombing Case)

असे आहे प्रकरण

१३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरी, कोरेगाव, पुणे येथे बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी पाच नागरिक हे परदेशी होते. या घटनेत हिमायत बेगला ७ सप्टेंबर २०१० रोजी दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या उदगीर येथील निवासस्थानातून अटक केली होती.

२०१३ मध्ये त्याला फाशीची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने सुनावली. या निर्णयाविरोधात त्याने हायकोर्टामध्ये अपील केले होते. २०१६ मध्ये दहशतवादाच्या आरोपातून त्याला मुक्त करण्यात आले. त्याच्या फाशीच्या शिक्षेमध्ये कपात झाली. मात्र बॉम्बस्फोट घडविण्यासाठी वापरले गेलेले आरडीएक्स त्याच्या ताब्यात असल्याचे सिद्ध झाले होते. (latest marathi news)

Himayat Beg
Jalgaon : अमळनेरात अल्पवयीन मुलीवर निर्जनस्थळी नेऊन अत्याचार; तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन बॅगा घेऊन जाताना जर्मन बेकरीच्या रस्त्यावर तो आढळला होता. अटकेनंतर रिक्षाचालकानेही त्याला ओळख परेडमध्ये ओळखले. त्यामुळे सहभाग निश्चित होता. म्हणून न्यायालयाने त्यास जन्मठेप सुनावलेली आहे.

पॅरोल रजेचा अधिकार

दोष सिद्ध झालेल्या कैद्यांना पॅरोल रजा मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी कैदी रीतसर अर्ज करतो. कारागृह प्रशासनामार्फत पोलिस, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या अभिप्रायासाठी पाठविला जातो. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशाने कैद्यांची रजा मंजूर केली जाते. जास्तीत जास्त ९० रजा ही मिळू शकते.

Himayat Beg
Nashik Rain Orange Alert : जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट! शहरात 10.2 मिमी पाऊस, रात्री विजांच्‍या कडकडाटासह बरसला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.