Nashik News : ‘पसा’ नूतनीकरणाला मिळेना प्रायोजक 3 कोटी खर्च अपेक्षित; आराखडा तयार

Nashik : परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाबाबत रंगकर्मींच्या उपस्थितीत बैठक झाली परंतु आजतागत प्रायोजक न मिळाल्याने पसा नूतनीकरणाचे काम रखडले आहे.
drama
dramaesakal
Updated on

Nashik News : रंगभूमी दिनी अर्थात ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाबाबत रंगकर्मींच्या उपस्थितीत बैठक झाली परंतु आजतागत प्रायोजक न मिळाल्याने पसा नूतनीकरणाचे काम रखडले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाट्यगृहाला सांस्कृतिक ओळख आहे. पसा परिसर हा शहरातील रंगकर्मी, कलावंतांचा हक्काचा सांस्कृतिक कट्टा आहे. ( Parshuram Saikhedkar Theatre renovation expected to cost Rs 3 crore )

राज्य नाट्य स्पर्धांपासून ते अनेक सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी होतात. तुटलेल्या खुर्च्या, वातानुकूलित यंत्रणा, स्वच्छता गृह, उपाहारगृहाचा अभाव, अपुरी पार्किंग यांसारख्या सुविधांअभावी प्रेक्षक आणि रंगभूमी कलावंतांमध्ये नाराजीचा सूर होता. रंगभूमी दिनाच्या दिवशी वास्तुविशारद श्याम लोंढे यांनी आराखडा सर्वांसमोर सादर केला. तसेच उपस्थित नाट्य क्षेत्राशी संबंधित कलावंतांनी विविध सूचना यावेळी केल्या होत्या. मात्र ५ नोव्हेंबर २०२३ नंतरच्या बैठकीनंतर आजतागत प्रायोजक न मिळाल्याने नूतनीकरण रखडले आहे.

लोंढे यांनी नाट्यगृहातील मेकअप रूम, व्हीआयपी रूम, महिला व पुरुष चेंजिंग रूम, उपाहारगृह, नवीन सेमी पुषबॅक खुर्ची बैठक व्यवस्था साउंड अकॉस्टिकल व्यवस्था, फ्लोअर कार्पेट, रंगमंच दुरुस्ती, नवीन विंग्ज, प्रकाशयोजना, साउंड सिस्टिम, एअर कुलर, वॉटर सप्लाय, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही, पार्किंग आदींचा विचार करून आराखडा तयार केला असून नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर इमारत भक्कम असून अपवाद भूकंप आल्यास इमारत पडू शकते. त्यामुळे इमारत पाडण्याची गरज नसल्याची चर्चा बैठकीत झाली होती.(latest marathi news)

drama
Nashik News : लोकसभेतून विधानसभेची चाचपणी; नांदगावी महाविकास आघाडीसमोर सुहास कांदेचे आव्हान

असा असेल बदल

आताची आसनक्षमता- ३५४, नवीन- ४१२,

आताची बाल्कनी आसनक्षमता- १५९, नवीन २००. एकूण- ६१२

स्टेज - एक हजार ४७५ स्क्वे फूट

साउंड व्यवस्था व पॅसेज- १८० स्क्वे फूट

आसन व्यवस्था व पॅसेज : एक हजार ६४५ स्क्वे फूट

मेकअप रूम, व्हीआयपी रूम, महिला व पुरुष चेंजिंग रूम, उपाहारगृह : दोन हजार ८७५ स्क्वे फूट

''आत्तापर्यंत शहरातील ४० व्यक्तींना भेटलो सर्व प्रोजेक्ट समजावून सांगतोय, पाठपुरावा करतोय. सर्व हो म्हणतात पण, कुणीही पुढची तारीख वा निधी देण्यासंदर्भात बोलत नाही. आराखडा तयार आहे फक्त निधीअभावी काम खोळंबले आहे. निदान राज्य नाट्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देणगीदार मिळणे अपेक्षित आहे.''- सुरेश गायधनी, नाट्यगृह सचिव

drama
Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या निर्मलवारी प्रस्तावाचा घोळ सुरूच; संत निवृत्तिनाथ महाराज विश्वस्तांची धरसोडवृत्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.