सटाणा : बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. सलग तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह धो-धो कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यात दाणादाण उडविली आहे. कांदा, मका, डाळिंब, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दिपिका चव्हाण यांनी आज तालुक्यातील सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेल्या नवेगाव शिवारातील शेती पिकांची पाहणी करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी केली. (particha paus devastating in Baglan)
बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. मुसळधार पावसाने डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या नवेगाव (ता. बागलाण) या गावात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचे पाण डोंगरावरून नवेगाव शिवारातील सर्व शेतांमध्ये जमा झाले. त्यामुळे हाती आलेली सर्वच पिके वाया गेली आहेत.
८०० एकराला दणका
गावातील दत्तू पवार, गोरख पवार, अंबर पवार, मानसिंग सूर्यवंशी, गणसिंग सूर्यवंशी, महेंद्र जाधव, रेखा सूर्यवंशी, विजय गवळी, काकाजी सूर्यवंशी, बाबाजी सूर्यवंशी, अण्णा जाधव, गोकुळ सूर्यवंशी, सुशीला अहिरे असे एकूण जवळपास २५० ते ३०० शेतकऱ्यांच्या ८०० एकरावरील कांदा, मका, डाळिंब, कांदा उळे, भुईमूग, भाजीपाला, तूर, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी जमा झाले आहे. त्यामुळे हाती आलेले पीक वाया गेले आहे.
माजी आमदार, राज्य महिला आयोगाच्या सदस्या दिपिका चव्हाण यांनी आज दौरा करून नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तहसीलदार कैलास चावडे यांना तत्काळ पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या सूचनाही केल्या. (latest marathi news)
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा उषाताई भामरे, प्रसाद चव्हाण, धनसिंग जाधव, आनंद अहिरे, नरेंद्र अहिरे, साहेबराव सूर्यवंशी, नथू सूर्यवंशी, भिका सूर्यवंशी, दत्तू पवार, धनसिंग जाधव, बापू पवार, संभाजी गवळी, गोरख पवार, योगेश निकम आदींसह शेतकरी उपस्थित होते.
दऱ्हाणे (ता.बागलाण) येथे काल (ता.१२) मध्यरात्री वीज पडल्याने आदिवासी वस्तीतील बापू गांगुर्डे यांच्या झोपडीस आग लागून त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. यावेळी सुदैवाने झोपडीत झोपलेले त्यांची पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे यांना वेळीच हलविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
मात्र या घटनेत गांगुर्डे यांचा संसार आता उघड्यावर पडला आहे. माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी गांगुर्डे कुटुंबीयांची भेट घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून त्यांना तत्काळ मदत मिळवून देण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.