नाशिक : जैन बांधवांचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्वाला १ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला. पुढील आठ दिवस जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व साजरा करतील. तर, दिगंबर समुदायातील बांधव दहा दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचे पालन करतात. त्याची सुरूवात ८ सप्टेंबरपासून होणार आहे.
जैन बांधव पर्युषण पर्व काळात मनातील सर्व क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्याची उपासना करतात. पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी संवत्सर साजरे केले जाते. या दिवशी वर्षभरात आपल्याकडून कुणाचे मन दुखावले असेल तर त्यांची क्षमा मागितली जाते. पर्युषण पर्व काळ हा आत्मा शुद्धीकरणासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो. (Paryushan Parva Best for Soul Purification)