Railway Station : इगतपुरी रेल्वे स्थानकात विक्रेत्यांमुळे प्रवासी त्रस्त! प्रवाशांच्या आरोग्याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे दुर्लक्ष

Nashik News : मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर खाद्यविक्रेते नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे खाद्य पदार्थांची विक्री करत आहे.
Food vendors while boarding the train at the railway station.
Food vendors while boarding the train at the railway station.esakal
Updated on

इगतपुरी शहर : मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या इगतपुरी रेल्वे स्थानकावर खाद्यविक्रेते नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे खाद्य पदार्थांची विक्री करत आहे. परिणामी याचा प्रचंड त्रास प्रवाशांना होत असून हा सर्व प्रकार रेल्वे सुरक्षा दलाच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे सर्रासपणे सुरू आहे. विशेष म्हणजे संपूर्ण स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये सर्व दृश्य चित्रित होत असताना देखील रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. (Passengers suffering due to sellers in Igatpuri railway station)

रेल्वे स्थानकात पाच कॅन्टीन असून जवळपास २०० खाद्य विक्रेते आहेत. रेल्वे कायद्यानुसार गाडी थांबली असता गाडीच्या बाहेर काही फूट अंतरावर उभे राहून खाद्यपदार्थ विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र हे विक्रेते जीव धोक्यात घालून स्थानकात प्रवेश करणाऱ्या सूरू असलेल्या गाडीत डब्यांमध्ये प्रवेश करून, मोठ मोठ्याने ओरडत खाद्य पदार्थ विक्री करतात.

दरवाजात घुसखोरी

उतरणाऱ्या प्रवाशांसह गाडीतील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होतो. गाडी स्थानकात आल्यानंतर एका डब्यात दहा ते पंधरा विक्रेते घुसत असल्याने प्रवाशांना चढणे व उतरण्यास मोठी अडचण होत आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकात चार प्लॅटफॉर्म असून एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल आहेत. (latest marathi news)

Food vendors while boarding the train at the railway station.
Nashik News : ‘इकॉनॉमी क्लस्टर’ म्हणून विकसित करा; सतराव्या स्थापना दिन सोहळ्यात विभागीय आयुक्त गेडाम यांचे प्रतिपादन

मात्र विक्री जास्त होण्यासाठी याचा वापर न करता हे विक्रेते जीव धोक्यात घालून थेट रेल्वे रूळ ओलांडून रेल्वेचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे. एखादी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण कॅन्टीन मालक की रेल्वे प्रशासन असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, प्रवाशांसाठी नियमावली, कायदे आहेत. त्याप्रमाणे विक्रेत्यांसाठी का नाही असा प्रश्न प्रवासी विचारत असून रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Food vendors while boarding the train at the railway station.
Nashik-Mumbai Highway : महामार्ग दुरुस्तीस पुन्हा ‘अल्टिमेटम’! दुरुस्तीसाठी 10 दिवस दिली मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.