मालेगाव : जुने ते सोने अशी म्हण आहे. शहरी भागातील अनेक नागरिक जुन्या सवयींकडे वळताना दिसत आहेत. शहरी भागात पाटा, वरवंटा, जाते, दगडी दिवा येथील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आहे. (pata varvanta craze continues in Kasmade)
तंत्रज्ञान वाढल्याने प्रत्येक घरात मिक्सर, ज्युसर, वॉशिंग मशिन, ठेचा करण्याचे मशिन, पिठाची चक्की यासह अनेक सुविधा नागरिकांना मिळाल्या. त्यामुळे एकीकाळी वापरल्या जाणाऱ्या पाटा, वरवंटा, जाते, दगडी दिवा यांची मागणी काही काळ घटली होती. शहरी भागात अनेक जण दगडापासून तयार केलेल्या वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. धुळे व नंदुरबार येथील वरवंटा व पाटे विक्रेते श्रावण महिन्यापासून येथे आले आहे. येथे नवरात्रोत्सवात जण दगडी दिव्याला मागणी आहेत.
नवरात्रबरोबरच आगामी दिवाळीत दिव्याला मागणी असेल. दगडाचा दिवा जास्त टिकत असल्याने नागरिकांचा कल वाढला आहे. जात्यात देखील तीन प्रकार बनविले जातात. यामध्ये चना, मठ, उडीद, मुग, चवळी या डाळी भरडण्यासाठी याचा वापर केला जातो.
येथे पाटे, वरवंटे बनविण्यासाठी आलेले बहुसंख्य कारागीर हे वर्षभर धुळे व नंदुरबार येथे साहित्य बनवितात. जाते व वरवंटा बनविण्यासाठी एका व्यक्तीला पाच ते सहा तास अवधी लागतो. सटाणा नाका, सोमवार बाजार, सोयगाव बाजार, सरदार मार्केट आदी भागात विक्री करतात. टेहरे चौफुलीनजीक धुळे येथील व्यावसायिकांनी दुकाने लावली आहेत. (latest marathi news)
असे आहेत दर
जाते - २०० ते ४०० रुपये
पाटा, वरवंटा - २०० ते ५०० रुपये
दगडी दिवा - १०० ते ३०० रुपये
धुण्याचे दगड- ३०० रुपये
दगडी खल - २०० रुपये
"श्रावण महिन्यापासून टेहरे चौफुली येथे कुटुंबीयांसोबत आलो आहेत. धुळे येथे ८ ते ९ महिने नदीकाठहून दगड आणून ठेवतो. एका दगडाला आणण्यासाठी २०० रुपयाप्रमाणे मजुरी दिली जाते. मालेगाववा पाच वर्षापासून येत आहे. यंदा जास्त प्रतिसाद आहे."
- यशोदाबाई गायकवाड, पाटे, वरवंटा विक्रेत्या, टेहरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.