Nashik News : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात एमआयआर मशिन नसल्याने रुग्णांना नाशिकला जावे लागते. त्यातून रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची परवड होते. त्यामुळे येथे एमआयआर मशिन बसवून दिलासा द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गडाख यांनी केली आहे. सिन्नर तालुक्याची लोकसंख्या ४ लाखांहून अधिक आहे. मूसळगाव व माळेगाव या दोन औद्योगिक वसाहती असल्याने या भागात बाहेरून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ( patients suffer due to lack of MRI machine in sinnar )
सिन्नर शहरात भव्य व प्रशस्त उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी गावोगावचे सामान्य लोक उपचाराला येतात. आजारांचे निदान करण्यासाठी रुग्णांना एमआरआय करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तेव्हा मात्र रुग्णांची गैरसोय होते. रुग्णांना घेऊन नाशिकला पॅथॉलॉजी लॅब मध्ये जाऊन दिवसभर ताटकळत थांबून एमआरआय करावा लागतो.
बाहेरून एमआयआर करण्यासाठी वेळ जातो गैरसोय होतेच, पण भरमसाट शुल्कही द्यावे लागते. सरकारी रुग्णालयात येणारा रुग्ण सामान्य कुटुंबातील असल्याने त्याला नाशिकला एमआरआय साठी जाणे परवडत नाही. ही परवड थांबविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने एमआरआय मशिनरी बसविण्यात यावी अशी मागणी अभिषेक गडाख यांनी केली आहे.
अपघातांचेही प्रमाण मोठे...
सिन्नर शहर नाशिक-पुणे , घोटी-शिर्डी व समृद्धी महामार्गाशी जोडलेले असून दोन्ही औद्योगिक वसाहतीत कारखाने आहेत. महामार्गावर अथवा कारखान्यात अपघात झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर या ठिकाणी त्याचा एमआरआय होत नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या जिवावरही बेतू शकते. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.