Nashik Civil Hospital : तीस ते चाळीस हजारात एखाद्याला होणारा दुर्मिळ व दूर्धर ‘विल्सन’ग्रस्त रुग्णांवर आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. त्यातही ही औषध महागडी असल्याने सर्वसामान्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी याबाबत सकारात्मकतेने पुढाकार घेत, जिल्हा रुग्णालयात आलेल्या विल्सनग्रस्त रुग्णांना तह हयात ही महागडी औषधे मोफत दिली जाणार असून, तशी तजवीज केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल दोघी सख्या बहिणींच्या औषधांची चिंता मिटली आहे. (Patients suffering from rare Wilson will get medicine for life in Civil Hospital)