Nashik News : दिव्यागांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा! एकाच दिवशी 104 रेशनकार्ड; ऑनलाइन नोंदणीद्वारे वितरण

Latest Nashik News : विशेष म्हणजे या कार्डधारकांची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांच्या हाती कार्ड सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे या दिव्यागांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
District Supply Officer Kailas Pawar, Tehsildar Ganesh Jadhav etc. while distributing ration cards in Collectorate office.
District Supply Officer Kailas Pawar, Tehsildar Ganesh Jadhav etc. while distributing ration cards in Collectorate office.esakal
Updated on

Nashik News : अंत्योदय योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या १०४ दिव्यांग बांधवांना एकाच वेळी पिवळ्या रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्डधारकांची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांच्या हाती कार्ड सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे या दिव्यागांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Paving way for disabled people to get ration food)

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार व तहसीलदार गणेश जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयात हा सोहळा पार पडला. अंत्योदय योजनेंतर्गत दिव्यांग बांधवांना पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड वितरित केले जाते. त्यासाठी शहरातील विविध भागातील महिला व पुरुषांनी या विभागाकडे अर्ज दाखल केले होते.

त्यांना एकत्रितपणे कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी कैलास पवार म्हणाले, शहराची लोकसंख्या २५ लाख असल्याने रेशन कार्ड वाटप करताना थोडाफार उशीर होतो. परंतु, पुरवठा विभागाने सर्व दिव्यांगांसाठी विशेष कॅम्प घेऊन त्यांना प्राधान्याने रेशन कार्ड वितरित केले आहेत. या विभागाचा हा तिसरा कॅम्प आहे. यापुढेही दिव्यांग बांधवांसाठी शिबिरे घेतले जातील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दिव्यांग बांधवांच्या एकाच वेळी रेशन कार्ड वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९० दिव्यांग व्यक्ती व १४ कुष्ठरोगग्रस्तांना तातडीने रेशन कार्ड दिले. फक्त रेशन कार्ड देवून उपयोग नाही तर त्याची ऑनलाइन नोंदणी करून त्याचा बारा अंकी नंबरही त्या रेशन कार्डवर टाकून दिला आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना आता कुठेच जाण्याची आवश्‍यकता राहणार नाही. (latest marathi news)

District Supply Officer Kailas Pawar, Tehsildar Ganesh Jadhav etc. while distributing ration cards in Collectorate office.
PCMC Samvidhan Bhavan : पिंपरीत होणार संविधान भवन; १२० कोटींची निविदा प्रसिद्ध

पुढील महिन्यापासून रास्त धान्य दुकानातून त्यांना धान्य मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कैलास पवार व गणेश जाधव यांनी पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात रेशन कार्ड वितरित केले. यानंतर सर्व लाभार्थ्यांना रेशनकार्ड मिळाले. यावेळी पुरवठा विभागातील कर्मचारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

वर्षभरात ५०० दिव्यांगांना लाभ

जिल्हा पुरवठा विभागाने दिव्यांग बांधवांसाठी शुक्रवारी तिसरे शिबिर घेतले. यापूर्वी दोन वेळा दिव्यांगांचे शिबिर व अंध व्यक्तींसाठी स्वतंत्र शिबिर घेऊन त्यांना रेशन कार्ड वितरित केले. शहरातील ५०० पेक्षा अधिक दिव्यागांना हे कार्ड वितरित केल्याचे पुरवठा विभागाने म्हटले आहे.

District Supply Officer Kailas Pawar, Tehsildar Ganesh Jadhav etc. while distributing ration cards in Collectorate office.
Nashik News : पवननगरमधील स्टेडियमला अवकळा! ट्रॅकवर खड्डे, ऑडिटोरियम अस्वच्छ, नळ गळक्या अवस्थेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.