नाशिक : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९ कोटी ९९ लाख ५४ हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बांधकाम, उद्यान व विद्युतविषयक कामे केली जाणार असल्याने स्मारकाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (redevelopment of Phalke Smarak 9 crore 99 lakhs through DPC)