नाशिक : नाशिकच्या पवन सानप याने २५ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघातर्फे बिहारवरील मोठ्या विजयात गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे , पुणे येथील स्टेडियम वर चार दिवसीय साखळी सामन्यात महाराष्ट्राने बिहार वर एक डाव व १४२ धावांनी मोठा विजय मिळवला. (Nashik Pawan Sanap impressive bowling in victory over Bihar and Arunachal from maharashtra side Nashik Sports Update)
आपल्या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजीने पवन सानपने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात १ गडी बाद केला . बिहारच्या पहिल्या डावात ८ षटकांत २४ धावांत ३ बळी मिळवले , तर दुसऱ्या डावात ११ षटकांत २४ धावांत १ बळी मिळवत संघाच्या विजयात हातभार लावला.
याआधीच्या आणंद येथे झालेल्या सामन्यात अरुणाचल प्रदेश विरुद्ध विजयाला हातभार लावताना पहिल्या डावात ७ षटकांत २७ धावांत २ बळी मिळवले होते व दुसऱ्या डावातही प्रभावी गोलंदाजी केली. अरुणाचल प्रदेश विरुद्धही महाराष्ट्राने एक डाव व ३२५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक व निकाल -
महाराष्ट्र वि बिहार - महाराष्ट्र - पहिला डाव ५ बाद ५८१ वि बिहार - पहिला डाव सर्व बाद १९६ व दूसरा डाव - सर्व बाद २४३.
महाराष्ट्रा एक डाव व १४२ धावांनी विजयी.
महाराष्ट्र वि अरुणाचल प्रदेश - महाराष्ट्र - पहिला डाव ३ बाद ४३४ वि अरुणाचल प्रदेश - पहिला डाव सर्व बाद ४९ व दूसरा डाव - सर्व बाद ६०.
महाराष्ट्रा एक डाव व ३२५ धावांनी विजयी.
महाराष्ट्राचे यापुढील सामने असे
२९ जानेवारी - गुजराथ ,५ फेब्रुवारी - चांदिगड १२ फेब्रुवारी - आंध्र .
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवनचे अभिनंदन करून स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.