लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथे स्मशानभूमीत पाण्याच्या टाकीचे बांधकाम कागदोपत्री एक वर्षापूर्वीच झाल्याचे दाखवून त्याचे बिल एक वर्षापूर्वीच ठेकेदाराला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, काम न करता परस्पर बिल काढून घेण्याचा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी आक्षेप घेत प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली. त्यामुळे आता पुन्हा बिल काढल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली आहे. (Pay bill to contractor without working incident at Jopul village)
पैसे दिले कसले?
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आता प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून टाकीच्या कामाला सुरवात झाली आहे. वर्षापूर्वी कागदावर बांधलेली टाकी आता प्रत्यक्षात दिसावी, यासाठी घाईघाईने पाण्याची टाकी बांधण्याचा प्रयत्न होत आहे.
स्मशानभुमीच्या टाकीचे आता बांधकाम सुरु झाले असेल तर मग वर्षापूर्वी कोणत्या कामाचे पैसे संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले, असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे. काम न करता अदा केलेल्या बिलाचे प्रकरण दडपण्यासाठी वर्षानंतर टाकीचे काम सुरु झाल्याने या प्रकाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. (latest marathi news)
"जोपूळ (ता.दिंडोरी ) येथील स्मशानभूमीत पाण्याची टाकी बांधण्याच्या नावाखाली न झालेली काम दाखवून पैसे काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यापासून ग्रामस्थांनी १४ व्या वित्त आयोग व पेसा निधीत असाच मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नवीन बांधकामाची चौकशी करण्याची मागणी असूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. अधिकारी चौकशीला येत नसल्याने या गैरव्यवहाराला प्रशासनाची साथ आहे का?"
- अंबादास गांगुर्डे, ग्रामस्थ, जोपूळ
"जोपूळ येथील स्मशानभूमिमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत चौकशी समिती नेमली आहे. कार्यकारी अभियंत्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, असा आदेश काढला आहे. पण, ते काम कोणत्या योजनेतून झाले आहे किंवा इतर काही विस्तृत माहिती उपलब्ध नसल्याने संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून ‘ब’ पत्रकाची मागणी केली आहे. ती अद्याप प्राप्त झाली नाही. लवकरात लवकर माहिती प्राप्त करून शहानिशा करेल."
- श्री. शिरसाठ, उपविभागीय अधिकारी, पं. स., पेठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.