Maha Shivratri 2024 : शेंगदाणे स्वस्त, साबुदाणा स्थिर! खवय्यांना महाशिवरात्रीच्या उपवासाचे लागले वेध

Nashik News : महाशिवरात्रीनिमित्त शहरी भागात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये फराळाच्या पदार्थांचे वाटप केले जाते
Sago and Peanuts
Sago and Peanutsesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक उपवास करतात. या पार्श्र्वभूमीवर आठवडाभरापासून फराळाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. आवक चांगली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो १० रुपयांची घट झाली आहे, तर साबुदाण्याचा दर स्थिरावला आहे. मागील वर्षी १५० रुपयांवर असलेले शेंगदाणे आता १४० रुपये किलो झाले आहेत. भुईमूगाचे चांगले उत्पादन झाल्याने भावात घट झाली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (nashik Peanuts price fall sago steady Maha Shivratri 2024 marathi news)

महाशिवरात्रीनिमित्त शहरी भागात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये फराळाच्या पदार्थांचे वाटप केले जाते. घरोघरी उपवास केला जात असल्याने किरकोळ बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा, खजूर आणि फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. रोजच्या स्वयंपाकासह उपवासात वापरला जाणारा शेंगदाणे मागील वर्षी तेजीत होते. यंदा १५० रुपये किलोवरून दर १४० रुपयांवर आला आहे. नवीन आवक सुरू झाल्याने ही घसरण झाली आहे.

मेमध्ये साबुदाणा महागणार

साबुदाणा ९० रुपये किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तो स्थिरावला आहे. मात्र, मे आणि जूनमध्ये त्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्पादन चांगले असून, मागणी कमी झाली आहे.

भगर महागली

अनेक ठिकाणी महाशिवरात्रीला उपवासात भगर खाण्याची प्रथा आहे. त्यानुसार भगरीची मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यात ११५ रुपये किलो असलेली भगर आता १२० ते १२५ रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे. मागणी वाढल्याने ही भाववाढ झाली आहे. (Latest Marathi News)

Sago and Peanuts
Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त न्याहळोदला यात्रोत्सव

खजूर, राजगिरा लाडूला मागणी

पिंपळगावच्या बाजारपेठेत फराळाच्या पदार्थांप्रमाणेच खजूर, राजगिराचे तयार लाडू व अन्य पदार्थांच्या मागणीत वाढ नोंदविली जात आहे. सध्या बाजारपेठेत १४० रुपये किलोपासून खजूर बाजारात उपलब्ध आहे. गुणवत्तेनुसार ३०० रुपये किलोपर्यंतचे खजूर मिळते. राजगिराच्या तीन, सहा, बारा लाडूचे पॅकेट बाजारपेठेत उपलब्ध असून, १० रुपयांपासून तर ३५ ते ४० रुपयांत मिळत आहे.

शिवमंदिरे सजली

पिंपळगाव शहरातील महादेवाची मंदिरे महाशिवरात्रीनिमित्त सजली आहेत. पुढील दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Sago and Peanuts
Nashik News : मालेगाव, सिन्नर, येवल्यात अनुदानापोटी 248 कोटी मिळणार! खरीप हंगामातील नुकसानीची मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.