Nashik News : प्रलंबित तक्रारींची शासनाकडून दखल; महापालिकेला निपटारा करण्याच्या सूचना

Nashik News : महापालिकेशी संबंधित तब्बल ४०२ तक्रारी ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रलंबित असल्याने राज्य शासनाने ‘आपले सरकार’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Aaple Sarkar Portal
Aaple Sarkar Portalesakal
Updated on

Nashik News : महापालिकेशी संबंधित तब्बल ४०२ तक्रारी ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रलंबित असल्याने राज्य शासनाने ‘आपले सरकार’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने प्रशासन उपायुक्त दत्तात्रेय पाथरूट यांनी विभागप्रमुखांना आयुक्तांच्या सूचनांचे पत्र जारी केले आहे. (Pending complaints taken cognizance by government)

महापालिकेच्या संदर्भातील तक्रारी करण्यासाठी एनएमसी ई-कनेक्ट ॲप नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु तक्रारींचा निपटारा होत नसल्याने नागरिकांनी थेट शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रारींसाठी शासनाचे आपले सरकार ॲप आहे. या पोर्टलवर महापालिकेशी संबंधित तक्रारी नोंदविता येतात.

आपले सरकार या पोर्टलवर महापालिकेशी संबंधित ४३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ ३५ तक्रारींचेच निराकरण करण्यात आले. ४०२ तक्रारी प्रलंबित असल्याने प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आढावा बैठकदेखील झाली. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी या तक्रारींच्या निराकरणासाठी खातेप्रमुखांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती प्रशासन उपायुक्त दत्तात्रेय पाथरूट यांनी दिली. (latest marathi news)

Aaple Sarkar Portal
Nashik School First Day : जुन्या कपड्यांत होणार विद्यार्थ्यांचे स्वागत! मोफत गणवेश वाटप योजनेचा सावळा गोंधळ

‘समाजकल्याण‘च्या अधिक तक्रारी

आपले सरकार पोर्टलवरील एकूण ४०२ तक्रारी प्रलंबित असून त्यातील २१२ तक्रारी समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कामगार कल्याण, क्रीडा, अभिलेख व महिला बालकल्याण विभागाशी संबंधित आहे. नगरनियोजन व भूसंपादन विभागाशी संबंधित ७७, अतिक्रमण ३८, सार्वजनिक बांधकाम २३, पाणीपुरवठा १०.

घनकचरा व्यवस्थापन ९, उद्यान ८, सार्वजनिक आरोग्य ७, शिक्षण ५, सामान्य प्रशासन, गोदावरी संवर्धन कक्ष प्रत्येकी ३, मालमत्ता कर आकारणी, जाहिरात व परवाने विभागाशी संबंधित प्रत्येकी २, तर सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान विभाग व सातपूर विभागीय कार्यालयाशी संबंधित प्रत्येकी एक तक्रारींचा समावेश आहे.

Aaple Sarkar Portal
Nashik News : मुंबईत खासदार वाजेंकडून शरद पवार यांचा सत्कार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.