Nashik Dengue Update : डेंगींच्या प्रलंबित चाचण्या आज निघणार निकाली! जिल्हा रुग्णालयात आरोग्य यंत्रणेच्या बैठकीत निर्णय

Nashik News : महापालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आलेले ७२२ डेंगी संशयितांचे अहवाल टेस्टिंग किटअभावी प्रलंबित असल्याचे उघड झाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
nashik Dengue Update
nashik Dengue Update esakal
Updated on

Nashik News : महापालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आलेले ७२२ डेंगी संशयितांचे अहवाल टेस्टिंग किटअभावी प्रलंबित असल्याचे उघड झाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय आरोग्य यंत्रणेने एकत्रित बैठक घेत प्रलंबित डेंगी चाचण्या शनिवारी (ता. २७) सायंकाळपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित झाले. (Nashik Dengue Update)

बैठकीत राज्यस्तरावरून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेत किट येतात. महापालिका क्षेत्रासाठी महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किट प्राप्त करण्याचे प्रयत्न करावेत, असाही निर्णय बैठकीत झाला. खासगी रुग्णालयांनी जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेत थेट डेंगी चाचणीचे नमूने पाठवू नयेत.

राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या यंत्रणांद्वारे जिल्हा प्रयोगशाळेत पाठवावेत, असेही ठरविण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील डेंगींचे सावट वाढत असून, चाचण्यांना उशीर होत असल्याने हे संकट वाढण्याचा धोका वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २७) आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली डेंगी आढावा बैठक झाली.

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आवेश पलोड. (latest marathi news)

nashik Dengue Update
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. पिळगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत गांगुर्डे, जिल्हा साथरोगतज्ज्ञ डॉ. राहुल हाडपे उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान पुणेमार्फत पंधरा किट प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. त्यामार्फत तेराशे डेंगी चाचणी शक्य आहे.

एका किटमध्ये नव्वद चाचण्या होतात. त्यानुसार २६ जुलैला सायंकाळपर्यंत ५६० चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित प्रलंबित चाचण्या शनिवारपर्यंत पूर्ण करण्याचे या वेळी ठरले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १ ते २५ जुलै यादरम्यान नाशिक शहरात २५४, तर जिल्ह्यात ४१ जणांना डेंगी झाला. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

डेंगी चाचणी अहवाल

विभाग संशयित रुग्ण डेंगीबाधित बरे झालेले रुग्ण मृत

नाशिक ग्रामीण ३१६ ३४ ३३ १

नाशिक महापालिका १,०१४ २५४ २५३ १

मालेगाव मनपा ३१ ०३ ०३ ०

इतर जिल्हा २५ ०४ ०४ ०

एकूण १,३८६ २९५ २९३ २

nashik Dengue Update
Nashik News : मुल्हेर किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवा धोक्यात! पाण्याच्या टाक्या, तलाव, विहिरीत साचला गाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.