Lunar Eclipse 2024 : होळीच्या दिवशी उपछाया चंद्रग्रहण; भारतात ग्रहणाचा सुतककाल नाही

Lunar Eclipse : या वर्षातील पहिले उपछाया चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होत आहे. भारतीय वेळेनुसार ते २५ मार्चला सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे.
Lunar Eclipse 2024
Lunar Eclipse 2024esakal
Updated on

Lunar Eclipse 2024 : या वर्षातील पहिले उपछाया चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होत आहे. भारतीय वेळेनुसार ते २५ मार्चला सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याने त्याचे वेध आणि अन्य नियम पाळावे लागणार नाहीत; त्यामुळे होळीचा सण उत्साहात साजरा करावा, असे धर्मशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे. (nashik Penumbral lunar eclipse on holi marathi news)

२५ मार्चचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे त्याच्या वेधाचे नियम पाळण्याची गरज नाही. होळी साजरी करण्यावर काहीही बंधने येणार नाहीत. तसेच पूजा-पाठावरही काही परिणाम होणार नाहीत; मात्र ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, काही राशींवर याचे चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात. तीन राशींवर या ग्रहणाचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

प्रत्येक चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी, चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो, त्याला उपछाया म्हणतात. अनेकदा चंद्र पृथ्वीच्या सावलीत शिरतो आणि तिथून बाहेर येतो आणि त्याचे स्वरूप अस्पष्ट दिसू लागते. याला छाया चंद्रग्रहण म्हणतात. उपछाया चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्व दिलेले नाही, त्यामुळे त्यात सुतक काळही वैध नाही. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते.(latest marathi news)

Lunar Eclipse 2024
Solar Eclipse 2022 : खगोलप्रेमींनी अनुभवला ग्रहणाचा थरार

पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर उपछाया चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवणार नाही.

''या वर्षातील पहिले चंद्रग्रहण २५ तारखेला आहे. भारतामध्ये या ग्रहणाचा सुतककाल नसल्यामुळे कुडल्याही नियमांची आवश्‍यकता नाही. होळी ही २४ तारखेला होत असून धुलिवंदन २५ तारखेला आहे. दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी प्रतिपदा सुरु होत आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे चंद्रग्रहणाचे नियम भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्रात पालन करण्याची गरज नाही.''- महंत सुधीरदास महाराज, धर्मशास्त्र अभ्यासक

Lunar Eclipse 2024
Solar Eclipse 2023 Photos and Videos : अमेरिकेत ठिकठिकाणी दिसलं वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.