निरंतर हवाई सेवेपासून नाशिककर वंचित

नाशिकमधून निरंतर हवाईसेवा उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
airplane
airplaneesakal
Updated on

नाशिक : कुठल्याही शहराचा विकास भौगोलिक स्थानावर अवलंबून असतो. भौगोलिक स्थानाचा विचार करता राज्यातील मुंबई- पुणे- औरंगाबाद या औद्योगिक शहरांच्या मध्यावर नाशिक शहर आहे. असे असतानाही नाशिकमधून निरंतर हवाईसेवा उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक शहरापासून देशाची आर्थिक राजधानी मुंबई १८० किलोमीटर अंतरावर आहे, तर राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे १९५ किलोमीटर अंतरावर आहे. राज्यातील अजून एक पुढारलेले औद्योगिक शहर औरंगाबाद नाशिकपासून १८० किलोमीटर अंतरावर आहे. शेजारच्या गुजरात राज्यातील उद्योगांचे सुरत शहर नाशिकपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. या चारही शहरांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण होते. या चारही शहरांच्या मध्यावर असलेल्या नाशिकमधून हवाईसेवा नाही, हे नाशिककरांचे दुर्दैव मानले जात आहे. नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा लढाऊ विमान तयार करण्याचा कारखाना व कारखान्यासाठी देशातील सर्वांत मोठी हवाईपट्टी असतानाही त्यावरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्याची हवाईसेवा केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत सुरू आहे. त्यामुळे या योजनेला किती भवितव्य आहे, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

airplane
अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी; जुलैपासून नोंदणी

''नाशिकला निरंतर हवाई सेवेची नितांत आवश्यकता आहे, तरच आयटी उद्योग शहरात येतील. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम अर्थात वायझ्याक शहराचे उदाहरण यासाठी पूरक आहे.'' - अनिल आहेर, संचालक, परफेक्ट बिल्डकॉन

''ओझर विमानतळावर काही प्रमाणात विमानसेवा सुरू असली, तरी ती सेवा कधी बंद पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे निरंतर सेवा सुरू होणे काळाची गरज आहे. गांधीनगर येथील कटलरी विमानतळाचा विचार होऊ शकतो.'' - अमोल पाटील, संस्थापक अध्यक्ष, युवा ऊर्जा फाउंडेशन

''जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांतून ओझरला टर्मिनल उभारण्यात आले. हवाई सेवेच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी ठरली. केंद्र सरकारने नाशिकच्या क्षमतांचा विचार करून नियमित सेवा सुरू करावी.'' - समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक

''आयटी कंपनी असलेल्या मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू शहरांचा विकास विमानसेवेमुळे झाला आहे. नाशिकमधूनही विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. तरच शहराचा विकास झपाट्याने होईल.'' - मच्छिंद्र देशमुख, अध्यक्ष, नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन

airplane
JEE Mains द्वितीय सत्राच्‍या नोंदणीची 'या' तारखे पर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.