NMC Flower Festival : स्पर्धात्मक प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Actor Bharat Ganeshpure, Actor Chinmoy Udgikar, Deputy Commissioner Vijaykumar Mundhe, Mayur Patil, Yogesh Kamod etc. along with the winners of the Pushpotsava photo competition organized by Municipal Corporation.
Actor Bharat Ganeshpure, Actor Chinmoy Udgikar, Deputy Commissioner Vijaykumar Mundhe, Mayur Patil, Yogesh Kamod etc. along with the winners of the Pushpotsava photo competition organized by Municipal Corporation.esakal
Updated on

नाशिक : महापालिकेचा उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित ‘पुष्पोत्सव २०२३’ चा रविवारी (ता. २६) तिसऱ्या दिवशी समारोप झाला. (Nashik people spontaneous response to NMC Flower Festival exhibition concluded nashik news)

मनपातर्फे आयोजित पुष्पोत्सव प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी झालेली गर्दी.
मनपातर्फे आयोजित पुष्पोत्सव प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी झालेली गर्दी. esakal

पुष्पोत्सव २०२३ निमित्त ‘सकाळ’चे छायाचित्रकार केशव मते, परीक्षक निसर्ग छायाचित्र तज्ज्ञ डॉ. श्रीश क्षीरसागर, चित्रकार तथा मूर्तीकार श्याम लोंढे यांचा सन्मान करण्यात आला. सुमारे दोन लाख नाशिककरांनी तीन दिवसात पुष्प महोत्सवाला भेट दिली.

विकएन्ड असल्याने पुष्पप्रेमींसह अनेक नागरिकांनी आवर्जून महापालिका मुख्यालयाला भेट देऊन फुलांची रंगीबेरंगी दुनिया अनुभवली. नागरिकांनी शनिवारी, रविवारी सायंकाळी रांगा लावून प्रदर्शनाचा आनंद लुटला.

सायंकाळी प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर उपस्थित होते. उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही अभिनेत्यांनी मुख्यालयातील विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. फुलांच्या जाती, कुंड्यांच्या सजावटीला दाद दिली. वैशिष्ट्यपूर्ण फुलांची माहिती जाणून घेतली.

Actor Bharat Ganeshpure, Actor Chinmoy Udgikar, Deputy Commissioner Vijaykumar Mundhe, Mayur Patil, Yogesh Kamod etc. along with the winners of the Pushpotsava photo competition organized by Municipal Corporation.
SET Exam : गणितासह विशेष विषयांनी फोडला घाम! 'सेट'ला साडेसात हजार परिक्षार्थींनी लावली हजेरी
मनपातर्फे आयोजित पुष्पोत्सव प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी झालेली गर्दी.
मनपातर्फे आयोजित पुष्पोत्सव प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी झालेली गर्दी.esakal

कार्यक्रमाच्या सुरवातीला सायक्लोन ग्रुप डान्स ॲकॅडमीच्या कलाकारांनी ‘गोदा तिरी स्वच्छतेची वारी’ विषयावर पथनाट्य सादर केले. डॉ. मुंढे यांनी भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री शिवकांता सुतार यांचा सत्कार केला.

भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदी शैलीत भाषण करून उपस्थितांना हसविले. नाशिकच्या समृद्धीत गोदावरीचा वाटा आहे. तिला स्वच्छ ठेवा. नागरिकांनीही जबाबदारीने वागून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.

पुष्पोत्सवाशी नाशिककरांचे घट्ट नाते

पुष्पोत्सवामुळे महापालिका, नाशिककरांचे नाते आणखी घट्ट होणार आहे, असा सूर उमटत आहे. ‘पुष्पोत्सव’मध्ये विविध गटात सुमारे ७५० प्रवेशिका आल्या होत्या. ३१ नर्सरी व ११ फूड स्टॉल होते. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपींग ठरले. मुख्यालयातील तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी होती.

विविध पुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टसच्या शोभीवंत कुंड्या ठेवल्या आहेत. जमिनीवरील आणि हँगिंग असे दोन्ही प्रकार पुष्पप्रेमींना भावले. उद्यानांच्या सहा प्रतिकृतीचेही नागरिकांनी कौतुक केले.

पुष्पोत्सवातील प्रांगणातील ३६० डिग्री सेल्फी, आतील लॉन्स कारंजा येथील सेल्फी पॉइंटवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी कुटुंबासोबत सेल्फी काढल्या. भारत गणेशपुरे यांनाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Actor Bharat Ganeshpure, Actor Chinmoy Udgikar, Deputy Commissioner Vijaykumar Mundhe, Mayur Patil, Yogesh Kamod etc. along with the winners of the Pushpotsava photo competition organized by Municipal Corporation.
Nashik News : भूखंडांसाठीच्या अटी जाचक; आयमा पदाधिकाऱ्यांचे सोनाली मुळेंना साकडे

विजेत्यांचा सन्मान

उद्यान प्रतिकृतीत प्रथम आलेला सातपूर विभाग, द्वितीय नवीन नाशिक विभाग, तृतीय पंचवटी विभागाचा यावेळी सन्मान करण्यात आला.

गणेशपुरेंनी सांगितले रडण्याचे तीन प्रकार

लग्न झाल्यानंतर सासरी कसे वागावे याचे प्रशिक्षण केंद्र काढल्यावर कसे गमतीचे अनुभव येतात याचे सादरीकरण गणेशपुरे यांनी केले. अभिनेत्री शिवकांता सुतार यांनी साथ दिली. सासू, सासरा, नवरा यांच्याशी कसे वागावे, बायकोने नवऱ्याला कसे सुनवावे, आणि नवरा अस्वस्थ होईल यासाठी रडण्याचे तीन प्रकार सांगताना नाशिककर नागरिक हसून हसून बेजार झाले.

Actor Bharat Ganeshpure, Actor Chinmoy Udgikar, Deputy Commissioner Vijaykumar Mundhe, Mayur Patil, Yogesh Kamod etc. along with the winners of the Pushpotsava photo competition organized by Municipal Corporation.
Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.