Nashik News : जॅक्सनच्या वधातील ‘ते’ पिस्तूल आजपासून पाहू शकतील नाशिककर!

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.esakal
Updated on

नाशिक : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक पाऊल पुढे पडावे म्हणून ब्रिटिशकालीन नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्सनचा हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी पिस्तूलमधून गोळ्या झाडून केलेल्या वधाला बुधवारी (ता. २१) ११३ वर्षे पूर्ण झाली. विजयानंद नाटकघरातील किर्लोस्कर मंडळींच्या शारदा नाटकावेळी हुतात्मा कान्हेरेंनी हा वध केला.

सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करण्यात आलेल्या या पिस्तूलची माहिती ‘सकाळ’मधून बुधवारी प्रसिद्ध झाली. ‘सावाना’तर्फे हे पिस्तूल नाशिककरांसाठी गुरुवारपासून (ता. २२) पाहण्यासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Nashik people will able to see pistol from Jackson murder by anant kanhere from today at savajanik vachanalaya Nashik News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
Nashik News : पंचवटी विभागात पादचारी मार्गाला अतिक्रमणांचा विळखा!

हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘सावाना’ने हा निर्णय घेतला आहे. ‘सावाना’चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी ‘सावाना’चे वस्तूसंग्रहालय गुरुवारपासून ३१ डिसेंबरपर्यंत रोज दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत नाशिककरांसाठी खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती ‘सकाळ'ला दिली. वस्तूसंग्रहालयात घराच्या दरवाजावरील आकर्षक कोरीव कामापासून ते हसऱ्या मुद्रेतील शंभू शंकराची मूर्ती, विविध आवाजाच्या घंट्या असा बराच मोठा ऐवज उपलब्ध आहे.

विंचूरकरांच्या शस्त्रागारातील १७ व्या ते १८ व्या शतकातील तलवार, ढाल यांसह चिलखत, तोफगोळे, अंकुश, भाल्याचे टोल, कट्यार, जमधर, जांबीया, सूळ आदी आहे. वज्रीवर रामायणातील युद्ध साकारण्यात आले आहे. ‘सावाना’चे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव यांनी वस्तूसंग्रहालयातील असलेल्या वेगवेगळ्या बाबींचा मानचिन्हांवर वापर करण्याचा मानस असल्याची माहिती दिली.

The pistol carried by martyr Ananth Kanhere, collector of Jackson's murder, in the Museum of Public Library Objects.
Nashik News : शासकीय इमारतींच्या अतिक्रमणामुळे गडकरी चौक बनला धोकादायक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.