Nashik News : जलसंपदा विभागातील 19 जणांना पदस्थापना; कनिष्ठ अभियंतापदी कायम नेमणूक

Nashik : पुणे यांनी शिफारस केलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या पदावर नाशिक महसुली विभागात प्रतीक्षा यादीतून १९ जणांना पदस्थापना दिली आहे.
Water Resources Department of Maharashtra
Water Resources Department of Maharashtraesakal
Updated on

Nashik News : जलसंपदा विभागात शासनाने राज्यस्तरीय निवड समिती, पुणे यांनी शिफारस केलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या पदावर नाशिक महसुली विभागात प्रतीक्षा यादीतून १९ जणांना पदस्थापना दिली आहे. जलसंपदा विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गासाठी ५०० पदे सरळ सेवेने पदे भरण्यासाठी २०१९ मध्ये ४९५ उमेदवारांची निवड करण्यात आली. (Permanent appointment of 19 people in Water Resources Department as Junior Engineer )

राज्यस्तरीय निवड समितीने गुणानुक्रमे व आरक्षण प्रवर्गानुसार १५७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार प्रथम प्रतीक्षा यादीतून ५८ व द्वितीय प्रतीक्षा यादीतून ३७ उमेदवारांना स्वतंत्र पदस्थापना देण्यात आली होती. मात्र, नाशिक विभागात आचारसंहितेमुळे २५ उमेदवारांना अधीक्षक अभियंता पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय, पुणे यांच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात रुजू करण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याने नाशिक महसुली विभागात २५ पैकी १९ उमेदवारांना सविस्तर पदस्थापना देण्यात आली आहे. (latest marathi news)

Water Resources Department of Maharashtra
Nashik News : भातशेती रुतली मजुरीच्या चिखलात; स्थानिक मजूर उद्योग कारखान्यात कार्यरत

पदस्थापना झालेले अभियंते असे ः अतुल पाटील (कळवण अंतर्गत सिंचन शाखा, बोरगाव), अक्षय सानप (कुकडी बांधकाम उपविभाग, आढळगाव), संदीप ढाले (गुणनियंत्रण उपविभाग, जळगाव), अभिजित राऊळ (सिंचन शाखा, वाडेगव्हाण), योगेश पाटील (जलहवामान आधारसामग्री प्रक्रिया, नाशिक), रोहित भोर (लघुपाटबंधारे उपविभाग, अकोले), शशिकांत लबडे (सिंचन शाखा क्रमांक दोन, मिरजगाव), शीतल भागवत (जलनिस्सारण उपविभाग, कोपरगाव), ऋषीकेश लीलके (वाघूर धरण उपविभाग- तीन, नशिराबाद), यशवंत गवळी (तापी खोरे सर्वेक्षण अन्वेषण पथक, जळगाव), प्रशांत पवार (जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ), शुभम चौधरी (सिंचन शाखा, नामपूर), रोहित चौधरी (मध्यम प्रकल्प पथक, नंदुरबार), पवन पारे (संकल्पचित्र विभाग, नाशिक), पवन पाटील (लघुपाटबंधारे क्रमांक दोन, संगमनेर), जयेशकुमार भोई (वाघूर धरण, जळगाव), शीतल ढोले (लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव), अश्विनी देसले (संकल्पचित्र विभाग, नाशिक), महेश राऊत (मिरजगाव अंतर्गत सिंचन विभाग, जळगाव).

Water Resources Department of Maharashtra
Nashik News : आयटी इंजिनिअर तरुणानी उचलले टोकाचे पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.