Nashik Leopard Attack : गडाख फार्म हाऊस वर पाळीव कुत्र्याची बिबट्याने केली शिकार!

Nashik News : सिन्नर तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे. याच दरम्यान पशुधनासह नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहे.
Photo caught on CCTV camera of a leopard hunting a dog at Gadakh Farm House in Sinnar.
Photo caught on CCTV camera of a leopard hunting a dog at Gadakh Farm House in Sinnar.esakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे. याच दरम्यान पशुधनासह नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहे. बारागाव पिंपरी रोडवर असलेल्या अण्णासाहेब सूर्यभान गडाख यांच्या फार्म हाऊस वर बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Nashik Leopard Attack)

बारागाव पिंपरी रोड लगत असलेल्या अण्णासाहेब सूर्यभान गडाख यांच्या फार्म हाऊसवर यांच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला आहे. साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या गडाख फार्म हाऊस वर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गडाख यांचे चौथे पाळीव कुत्र बिबट्याची शिकार..

मागच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी अण्णासाहेब गडाख यांच्या फार्म हाऊस वर बिबट्याने हल्ला करीत पाळीव कुत्र्यांची शिकार केली होती तसेच मागील महिन्यात कालवड याची शिकार करीत. (latest marathi news)

Photo caught on CCTV camera of a leopard hunting a dog at Gadakh Farm House in Sinnar.
Nashik Monsoon Rain Update : भोजापुर धरणात 2 दिवसांत पस्तीस टक्के पाणीसाठा जमा

बिबट्याने परिसरात धुमाकूळ घातला आहे. पहाटे व सायंकाळी पिंपरी रोड लगत अनेक नागरिक फिरण्यासाठी येत असतात. नागरिकांनी सजगतेने रस्त्यावर फिरावे. असे आव्हान परिसरातील नागरिकांनी केले आहे.

परिसरात पिंजरा लावण्याची जोरदार मागणी

या परिसरात अनेक बिबट्या असून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली असून. सायंकाळी सात नंतर बाहेर निघण्यासाठी कोणीही‌ धजावत नसून. बिबट्याने मनुष्याला हल्ला केला तर याला जबाबदार कोण असा सवाल जवाब नागरिकांनी केला असून लवकरात लवकर येथील परिसरात पिंजरा लावण्याची मागणी येथील परिसरातील शेतकरी व अण्णासाहेब सूर्यभान गडाख यांनी संबंधित विभागाला केली आहे.

Photo caught on CCTV camera of a leopard hunting a dog at Gadakh Farm House in Sinnar.
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.