Nashik Tomato Demand : पिंपळगावच्या टोमॅटोचा आखाती देशांत डंका! प्रतिक्रेट 600 रुपये; बांगलादेशात मोठी मागणी

Latest Agriculture News : रविवारी (ता. १५) पिंपळगाव बाजार समितीत २० किलोंच्या क्रेटला तब्बल सहाशे रुपये असा दर मिळाला. तीन वर्षांनंतर टोमॅटोच्या दराला एवढी लाली चढली आहे.
Ongoing packing of tomatoes for export to Bangladesh at Pimpalgaon Baswant Bazaar Committee.
Ongoing packing of tomatoes for export to Bangladesh at Pimpalgaon Baswant Bazaar Committee.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : गेल्या वर्षी बाजारभावामुळे दगा देणाऱ्या टोमॅटोचे दर यंदा जोरदार तेजीत आहेत. देशांतर्गतसह बांगलादेश व आखाती देशांमध्ये पिंपळगावच्या टोमॅटोचा डंका आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने दर वधारले आहेत. रविवारी (ता. १५) पिंपळगाव बाजार समितीत २० किलोंच्या क्रेटला तब्बल सहाशे रुपये असा दर मिळाला. तीन वर्षांनंतर टोमॅटोच्या दराला एवढी लाली चढली आहे. (Pimpalgaon tomato popular in Gulf countries)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.