नरकोळ: पावसाळ्यात फुल-फळांची रोपे लागवड केल्यास निश्चित फायदा होतो. त्यामुळे सध्या शहरांसह ग्रामीण भागातील बंगल्याजवळच्या मोकळ्या जागेत परसबाग फुलविण्यासाठी रोपांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारची शेकडो फळ, फुलांची रोप उपलब्ध असून, खरेदीसाठी ग्राहकांची पावले नर्सरी व फळझाडांच्या विक्रेत्यांकडे वळू लागली आहेत.(Planting trees)
आकर्षक व मनात भरतील अशी रोपे ग्राहक खरेदी करीत आहेत. गेल्यावर्षी पेक्षा यंदा पावसाळा उशिराने सुरू झाल्याने विक्रेत्यांची रोपे पडून होती. आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणातील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रोपांना मागणी वाढली आहे. शहरातील रहिवासी घरे, बंगल्याच्या परिसरातील परस बागेसाठी रोपे खरेदी केली जात आहेत.
शेतकरी बंगल्यासमोर व बांधावर नारळासह आंब्याची रोपे खरेदी करीत आहेत. यंदा मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या भागातून आंबा व नारळाची, तर रत्नागिरी, बलसाड येथून चिकूची रोपे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. बहुतांश विक्रेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रोपांची विक्री करीत आहेत.
"शहरासह आता ग्रामीण भागातही परस बाग करण्याची आवड अनेकांना असते. पावसाळ्याच्या आगमनानंतर फूल, फळ झाडांच्या रोपांना मागणी आहे. जून महिन्यात पाऊस कमी झाल्याने विक्री झाली नाही. आता जोरदार पावसाच्या आगमनाने सध्या रोपांची विक्री चांगली आहे." - सुशिल पाल, रोप विक्रेते, सटाणा (latest marathi news)
केशर आंब्याला पसंती
बाजारात केशर आंब्याला मागणी जास्त असते. या उद्देशाने सध्या केशर आंब्याच्या रोपांचा मागणी आहे. ग्राहक केशर आंब्याचे रोप आहे का. हीच विचारणा करतात.
असे आहेत रोपांचे दर
फुलझाडे
गुलाब : ६० ते १००
जास्वंदी, मोगरा : ६० ते ११०
जाई, शेवंती : ६० ते १२०
अशोका : ८०
चमेली : १२०
सोनचाफा : २५०
तुळस, गवती चहा : ४० रुपये
गोल्डन, आरकेपाम, बटरपाम : १५० ते २००
रबरपॅन : २००
रातराणी : ६० ते १००
मधुमालती : १००
कनेर : १०० ते १४०
मोरपंखी : ६० ते १५०
फळझाडे
नारळ : ४००
चिकू : ३००
आंबा, रामफळ : ८० ते १००
सिताफळ आवळा, फणस : ८० ते १००
पेरू : १०० ते १५०
लिंबू, समीपत्रा : १५०
चिकू : २०० ते २५०
बदाम : ५० रुपये
जांभूळ : १२०
रामफळ : १३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.