Nashik News : कॅट स्पर्धेत नाशिकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Nashik: Congratulating Sanket
Nashik: Congratulating Sanketesakal
Updated on

नाशिक : व्‍यवस्‍थापन शास्‍त्रातील इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) व अन्‍य राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्‍या 'कॅट' परीक्षेत नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. संकेत मन्ना याने ९९.९८ पर्सेंटाईल मिळविले असून, आयुष माचा याने ९९.७८ पर्सेंटाईल मिळविलेले आहेत. आता मुलाखतीनंतर त्‍यांची आयआयएमसाठी अंतीम निवड होऊ शकेल.

दोघे विद्यार्थी कॉलेज रोडवरील आयएमएस नाशिक येथील आहेत. या निकालाविषयी संकेत व आयुष यांनी पत्रकार परिषदेतून संवाद साधला. संकेत मन्ना म्‍हणाला, की कॅट परीक्षेत अकरा विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाईल मिळविले आहेत. (Nashik players huge success in CAT competition nashik sports news)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Nashik: Congratulating Sanket
Nashik News : सायकलींग हा आरोग्यदायी व्यायाम

९९.९९ पर्सेंटाईल मिळविणारे २२ विद्यार्थी असून, ९९.९८ पर्सेंटाईल २२ विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. आपल्‍या दुसर्या प्रयत्‍नात यश मिळविले असून, नामांकित आयआयएममध्ये प्रवेशासाठी प्रयत्‍न असेल. मुलाखतीची तयारी सुरु असून, त्‍यातही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. दरम्‍यान संकेत हा सिटी बँकमध्ये ॲनॅलिस्‍टपदावर काम करतो आहे.

आयुष म्‍हणाला, की तिसऱ्या प्रयत्‍नात मी परीक्षेत यश मिळविलेले आहे. नामांकित संस्‍थेतूनच व्‍यवस्‍थापनशास्‍त्र शिक्षण घेण्याचे धेय्य असल्‍याने प्रयत्‍न करत राहिलो. यशस्‍वीदेखील झालेलो आहे, आता मुलाखतीची तयारी करत प्रवेशासाठी प्रयत्‍न करणार आहे. आयुष हा सिटी बँकेत फिल्‍ड असिस्‍टंट या पदावर कार्यरत आहे. मुलाखतीतून यश मिळविल्‍यास या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश दिला जाईल.

Nashik: Congratulating Sanket
Nashik News : मालेगावात ॲप्पल बोरची धूम! रोज पंधराशे कॅरेटची आवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.