Nashik ESIC Hospital : संकेतस्थळ नादुरुस्तीमुळे इएसआयसीत रुग्णांचे हाल

Nashik News : इएसआयसी रूग्णालयाचे संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने शेकडो रुग्णांना इनटायटल अर्ज काढता येत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
ESIC hospital File Photo
ESIC hospital File Photoesakal
Updated on

सातपूर : इएसआयसी रूग्णालयाचे संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने शेकडो रुग्णांना इनटायटल अर्ज काढता येत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. ऑनलाइन सुविधा ठप्प झाल्याने कामगार वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे. (Nashik plight of patients in ESIC Hospital marathi news)

ESIC hospital File Photo
Nashik Lok Sabha Election 2024: हिरकणी कक्ष, पाळणाघराची 320 केंद्रावर सोय! लोकसभेसाठी 200 अंगणवाडी सेविकांची नेमणूक

दरम्यान देशभरातील औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी इएसआयसी रूग्णालयाची सुविधा ही एक वरदान आहे. पण ही सुविधा ऑनलाइन बंद झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून ही साइट नादुरूस्त आहे. यामुळे रुग्णांचे इनटायटल फॉर्मही मिळत नाही. त्यामुळे रुग्णाला आरोग्याचा सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाली आहे.

साइट ही दिल्लीवरूनच बंद झाल्याने राज्यातील अधिकारीही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर लवकरच सुरू होईल पण हे दिल्लीवरून होत असल्याने वेळ लागेल, असेही दबक्या आवाजात सांगितले जात आहे. तर गेल्या चार दिवसांपासून संकेतस्थळ बंद असल्याने रेकॉर्ड दिसत नाही. त्यामुळे लाभ घेता येत नसल्याची भावना कामगार धनराज माळी यांनी व्यक्त केली.  (latest marathi news)

ESIC hospital File Photo
Nashik: गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राला जिल्हा प्रशासनाडून केराची टोपली! अनेक ग्रामपंचायतींचे महा ऑनलाईन ID इतरत्र सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()