PM Fasal Bima Yojana: एक रुपयांत 80 हजारांपर्यत विमाकवच! कांद्याला 80 , मकाला 35 हजार, तर कापसाला 60 हजारांचे संरक्षण

Nashik News : खरीप हंगामातील विम्यात सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या सेवा केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.
PM Fasal Bima Yojana
PM Fasal Bima Yojanaesakal
Updated on

येवला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा हप्ता कमी होऊन सरकार भरणार असल्याने अनेक शेतकरी विमा काढण्याकडे वळत आहे.यावर्षी खरीप हंगामातील कांद्याला ८०, मकाला ३५, तर कापसाला ६० हजारांचे विमा संरक्षण संरक्षण मिळणार आहे.

पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना लागू केल्याने खरीपाचा पीकविमा १५ जुलैपूर्वी भरून घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग करीत आहेत. (Nashik PM Fasal Bima Yojana up to 80 thousand for one rupee)

खरीप हंगामातील विम्यात सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या सेवा केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. जिल्ह्यात ओरिएण्टल इन्शुरन्स या कंपनीची प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नियुक्ती केली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागीलवर्षी विक्रमी १ कोटी ७० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. खरीपासाठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारले, कांदा १४ पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा लागणार आहे.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमिन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मशिदीच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. या योजनेत जे पीक शेतात लावले आहे, त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल.

यावर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्‍चित केले जाणार आहे. (latest marathi news)

PM Fasal Bima Yojana
Spacewalk Viral : ..अन् अंतराळवीर थेट पृथ्वीच्या वर लटकला; चीनच्या यानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल,बघितला काय?

शेतकऱ्यानी काय करावे?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र, त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाआधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरण्याबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.

इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकणार आहे.

असे आहे संरक्षण

पीक - विमा संरक्षित रक्कम

बाजरी - ३३९१३

मुग - २००००

उडीद - २००००

तुर - ३६८०२

सोयाबीन - ५००००

कापूस - ५९९८३

मका - ३५५९८

कांदा - ८००००

"पिकविमा योजना शेतकरी हितासाठी आहे. विविध नैसर्गिक आपत्तीत नुकसानीची मदत मिळणार आहे. योजना ऐच्छिक असली तरी अवघ्या एक रुपयात विमा उतरला जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा." - शुभम बेरड, तालुका कृषि अधिकारी, येवला

PM Fasal Bima Yojana
Palkhi Ceremony : संत वासुदेव महाराज पंढरी; हरिनामाच्या गजराने अकोट नगरी दुमदुमली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.