PM Surya Ghar Yojana : सौरउर्जेचा शंभर मेगावॉटचा टप्पा पार; ‘रूफटॉप सोलर’मध्ये 25 हजार ग्राहक

PM Surya Ghar Yojana : राज्यात २५ हजार ८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॉट क्षमतेची यंत्रणा बसविल्याने राज्याने शंभर मेगावॉटचा टप्पा पार केला आहे.
PM Surya Ghar Scheme
PM Surya Ghar Schemeesakal
Updated on

PM Surya Ghar Yojana : घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात २५ हजार ८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॉट क्षमतेची यंत्रणा बसविल्याने राज्याने शंभर मेगावॉटचा टप्पा पार केला आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला केली आहे. (25 thousand customers in Rooftop Solar crossed 100 megawatt mark of solar energy )

‘महावितरण’च्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी होत असून, शंभर मेगावॉटचा टप्पा ओलांडल्याबद्दल ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे अभिनंदन केले. ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॉट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारीत सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसविणाऱ्या २५ हजार ८६ ग्राहकांना अनुदानाची रक्कम रुपये १६० कोटी थेट ग्राहकांना हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे.

अशी आहे योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीत दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रूफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प ७५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे. (latest marathi news)

PM Surya Ghar Scheme
PM Surya Ghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी राज्यात पावणेदोन लाख नोंदणी

साडेतीन लाख ग्राहकांची नोंदणी

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण तीन लाख ५१ हजार ९४२ ग्राहकांची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणी झालेली आहे. यापैकी योजनेत दोन लाख ३३ हजार ४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केलेला आहे.

इथे मिळेल योजनेची माहिती

ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्याने वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज ‘महावितरण’ विकत घेते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून, ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

PM Surya Ghar Scheme
PM Surya Ghar Yojana : ‘पीएम सूर्यघर’योजना ठरतेय ग्राहकांसाठी डोकेदुखी,जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.