Nashik News : खासगी वाहनांवर ‘भारत सरकार’,‘महाराष्ट्र शासन’, पोलिस नावांच्या पाट्या; कायदा धाब्यावर

Nashik : चारचाकी वाहनांवर ‘भारत सरकार’, ‘महाराष्ट्र शासन’, पोलिस अशा पाट्या वाहनाच्या दर्शनी भागावर लावून ही वाहने शहरभर मिरवली जात आहेत.
Government name plates on vehicles.
Government name plates on vehicles.esakal
Updated on

Nashik News : पुण्यात तथाकथित पूजा खेडकर या त्यांच्या खासगी महागड्या वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून मिरवत असल्याचे प्रकरण राज्यातच नव्हे तर देशभरात गाजते आहे. असे असतानाही नाशिक शहरातही महागड्या चारचाकी वाहनांवर ‘भारत सरकार’, ‘महाराष्ट्र शासन’, पोलिस अशा पाट्या वाहनाच्या दर्शनी भागावर लावून ही वाहने शहरभर मिरवली जात आहेत. (action on Nameplate of Government of India on private vehicles )

विशेषतः शासकीय अधिकार- कर्मचाऱ्यांकडूनही कायदा धाब्यावर बसवून असे कृत्य केले जात असताना मात्र ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, ते प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने समोर आली आहे. विशेषतः जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या आवारातच अशा पाट्या लावलेली खासगी वाहने असतात हेही विशेषच.

शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेट या फॅन्सी प्रकारातील असतात. तर काही क्रमांक हे नामसदृश करण्याचा प्रयत्न केला गेलेला असतो. परंतु अलीकडे नवीनच क्रेझ आली आहे. अतिशय महागड्या अशा गाड्यांवर ‘भारत शासन’, ‘महाराष्ट्र शासन’, पोलिस, ‘न्यायाधीश’ अशी नावे असलेल्या पाट्या कार चालकासमोरील दर्शनी भागावर ठेवलेल्या असतात. तर काही वाहनांवर समोरील बोनेटवर आणि पाठीमागील काचेवरही ‘भारत शासन’, ‘महाराष्ट्र शासन’ आणि पोलिस असेही लाल रंगाच्या अक्षरात ठळकपणे लिहिलेले असते.

प्रत्यक्षात, मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही खासगी वाहनांवर शासकीय नावाची पाटी वापरण्यास सक्त मनाई आहे. एवढेच नव्हे तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही आहेत. मात्र, असे असतानाही शहरात अशा पाट्या लावून शेकडो वाहने फिरत असतात. याकडे ना शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे लक्ष नाही आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी, अशा पाट्या लावण्याचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. (latest marathi news)

Government name plates on vehicles.
Nashik Crime News : पाचशे रुपयांऐवजी पाच हजारांची केली ‘आरडी’! डाक सहायकाचा प्रताप; पोस्टाचे लाटले RDचे 9 लाख

महागड्या गाड्यांवर पाट्या कशा?

शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असलेली वाहने ही इनोव्हा प्रकारातील तर उर्वरित अधिकाऱ्यांसाठी बोलेरो, इर्टिका, स्कॉर्पिओ आणि सुमो  या प्रकारातील असतात. परंतु ‘सकाळ’ च्या पाहणीतून ज्या खासगी वाहनांवर अशा नावांच्या पाट्या आढळून आल्या, त्यात फॉर्च्युनर, ऑडी, इनोव्हा, ग्लोस्टर, एक्सयुव्ही, डिझायर, होंडासिटी अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. ही वाहने शासकीय नसल्याचेही आढळून आलेले आहे.

नातलगांची दबंगगिरी!

अशा पाट्या लावून फिरणाऱ्या गाड्यांमध्ये कोणीही अधिकारी नसतात. तर बहुतांश प्रकारात अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचे नातलग असतात. काही वाहने तर कर्मचाऱ्यांची असल्याचे निदर्शनास आलेली आहेत. वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलिस, न्यायाधीश अशा पाट्या लावून नातलगांकडून एकप्रकारे दबंगगिरी करण्याचाच प्रयत्न होताना दिसतो आहे.

गैरवापराचीही शक्यता

कायदाच धाब्यावर बसवून अशा पाट्या लावून फिरणाऱ्या वाहनांमध्ये खरेच शासकीय अधिकारी आहे का, हा यश प्रश्न आहे. सराईत गुन्हेगारांकडूनही अशा पाट्यांचा गैरवापर केला जाऊ शकतो. एरवी सर्वसामान्यांना या ना त्या कारणावरून वाहतूक नियमांचे
उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करणारे शहर पोलिस मात्र,  ही बाब गंभीर असूनही अशा वाहनांविरोधात कठोर कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होते आहे.

Government name plates on vehicles.
Nashik News : राष्ट्रवादीच्या विधानसभा समन्वयकांची आज बैठक; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा 2 दिवसांचा जिल्हा दौरा

मोटार वाहन कायद्यातील तरतूद

मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना खासगी वाहनांवर सरकारी नावाची पाटी वापरण्यास सक्त मनाई आहे. खासगी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा इतर सरकारी नावाचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १७७ चे उल्लंघन ठरते. त्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई होते. वारंवार आढळून आल्यास गंभीर स्वरूपाचीही कारवाई केली जाऊ शकते.

''खासगी वाहनांवर शासकीय पाट्या लावणे कायदेशीर गुन्हा आहे. अशा वाहनांविरोधात शहर पोलिसांकडून धडक कारवाई केली जाईल. कोणीही अशारीतीने शासकीय पाट्या वाहनांवर लावू नये. अन्यथा यापुढे कठोर कारवाई केली जाईल.''- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त

Government name plates on vehicles.
Nashik News : पाण्याच्या स्रोतांचे वेळेत शुद्धीकरण करा : दीपक पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.