Nashik Police : स्ट्रीट क्राईमविरोधात पोलीस आक्रमक! ठाणेनिहाय पायी पेट्रोलिंग अन गुन्हेगारांना दणका

Nashik News : गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना वाढल्या असून, उपनगरीय परिसरात सतत मारहाणीच्या घटना घडत आहे.
Ongoing foot patrolling of the police within the limits of Chunchale Police Station.
Ongoing foot patrolling of the police within the limits of Chunchale Police Station.esakal
Updated on

Nashik Police : गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना वाढल्या असून, उपनगरीय परिसरात सतत मारहाणीच्या घटना घडत आहे. त्याविरोधात पोलिस आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेतली असून, पोलीस ठाणेनिहाय (Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पायी पेट्रोलिंग करीत टवाळखोरांना चोप देणे सुरू केले आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या पायी पेट्रोलिंगमुळे गुन्हेगारांचा चांगलाच दणका बसला आहे. (Nashik Police aggressive against street crime marathi news)

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांकडून सुरू असलेली पायी पेट्रोलिंग.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांकडून सुरू असलेली पायी पेट्रोलिंग. esakal

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये किरकोळ कारणांवरून सातत्याने मारहाणीच्या घटना घडत आहेत. तर काही घटनांमध्ये संशयितांकडून थेट हत्याराने हल्ला होतो आहे. या घटनांमुळे टवाळखोरांसह गुन्हेगारांनीही डोके वर काढल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

त्यासाठी आयुक्तांनी पोलीस ठाणेनिहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपआपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये पायी पेट्रोलिंग सुरू केली आहे.

पोलीस ठाणेनिहाय असलेल्या गर्दीची ठिकाणे, भाजी मार्केट, व्यापारी संकुल, मुख्य रस्त्यांसह जॉगींग ट्रॅक अशा ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत पोलिसांनी पायी पेट्रोलिंग सुरू केले आहे. यावेळी पोलिसांकडून मार्केट परिसरात असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांचीही तपासणी केली जात आहे. (Latest Marathi News)

तसेच, याठिकाणी बसलेल्या टवाळखोरांना दांडुक्यांचा प्रसादही दिला जाता आहे. त्याचप्रमाणे, मैदानांमध्ये अंधाराच्या आडोशाला बसलेल्या टवाळखोरांनाही पोलिसांकडून चोप देण्यात येत असल्याने टवाळखोरांसह गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

येथे पोलीस आक्रमक

आयुक्तालय हद्दीतील उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड, चुंचाळे पोलीस चौकी, सातपूर, मुंबई नाका, पंचवटी, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकांकडून पायी पेट्रोलिंग केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()