Nashik News : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद सोमवारी (ता.१७) शहरात उत्साहात साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्यांमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये जागरूकता व दक्षता पाळतानाच, सामाजिक सलोख्याचे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे. (police alert mode Tight security in city due to Bakri Eid today)
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. परिमंडळ एकमध्ये उपायुक्त किरणकुमार चव्हाण, तर, परिमंडळ दोनमध्ये उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या.
यावेळी शहरात साजरा होणारा बकरी ईद हा सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले. याकाळात सध्याची परिस्थिती पाहता सतत जागरूकता, दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
तसेच सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करताना काळजी घ्यावी. आक्षेपार्ह असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (latest marathi news)
कडेकोट बंदोबस्त
पोलिस उपायुक्त - ४
सहाय्यक पोलिस आयुक्त - ६
पोलिस निरीक्षक - २७
उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक - ५४
पोलिस अंमलदार - ६००
होमगार्ड - ७००
राज्य राखीव दलाची तुकड्या - २
शीघ्रकृती दल - १
एसआरपीएफ प्लाटून - ३
संवेदनशिल परिसरावर वॉच
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून शहरातील जुने नाशिक, नाशिकरोड, इंदिरानगरमधील वडाळागाव, मुंबई नाका हद्दीतील भारतनगर या संवेदनशिल परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. तसेच रविवारी रात्रीपासून शहरातील विविध भागांवर २४ तास पोलिस गस्त राहणार आहे.
"बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि पोलिसांची गस्त आयुक्तालय हद्दीत राहणार आहे." - संदीप मिटके, सहायक आयुक्त, विशेष तथा गुन्हे शाखा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.