Nashik News : त्र्यंबकेश्‍वर प्रकरणी पोलिसांसह तहसीलदारांना चौकशीचे आदेश; भाविकांना मारहाण प्रकरण

Nashik News : बारा ज्योर्तिंलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षारक्षकाने मारहाण केल्यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Nashik District Collector Jalaj Sharma
Nashik District Collector Jalaj Sharmaesakal
Updated on

Nashik News : बारा ज्योर्तिंलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षारक्षकाने मारहाण केल्यावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्‍वरला भेट देत पोलिसांसह तहसीलदारांनाही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. (Police and Tehsildar ordered to investigate Trimbakeshwar case)

सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्याने धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी वाढली आहे. नाशिकचे महेंद्र सूर्यवंशी हे रविवारी (ता. १६) आपल्या आई-वडिलांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन करीत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढण्याची घाई केली. त्या वेळी महेंद्र यांची सुरक्षारक्षकांबरोबर बाचाबाची झाली.

यातून सुरक्षारक्षकांनी अपभाषेचा वापर करीत मारहाण केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी शर्मा यांनी सोमवारी त्र्यंबकेश्‍वरला भेट देत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, भाविकांचे वेळेत दर्शन होईल आणि योग्य सुविधा प्रशासन त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

दरम्यान, मंदिर विश्‍वस्तांकडूनही या प्रकरणाचा खुलासा करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षारक्षकांनी संबंधित भाविकांना पुढे जाण्यास सांगितले. मात्र, संबंधित भाविकांनी चारधामचे तीर्थ चढविण्यासाठी आग्रह धरला. त्यात वृद्ध महिलेचा पाय अडकून ती पडली. यातूनच वाद निर्माण झाला असून, या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे. (latest marathi news)

Nashik District Collector Jalaj Sharma
Nashik Teacher Constituency : निष्क्रियता सांगणाऱ्या कोल्हेंनी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये : प्रा. रवींद्र मोरे

प्रसाद शुद्धीकरणाविषयी अनभिज्ञ

त्र्यंबकेश्‍वर मंदिराबाहेर विक्री करण्यात येणाऱ्या प्रसादात भेसळ असून, वर्ज्य असणाऱ्या गोष्टींचा त्यात समावेश असल्याचा आक्षेप तेथील हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या विषयी प्रसाद शुद्धीकरण मोहीमही राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्र्यंबकेश्‍वर येथील भेटीत याविषयी काहीच माहिती देण्यात न आल्याचे भेटीदरम्यान उघडकीस आले.

सिंहस्थासह संत निवृत्तिनाथ वारीचाही आढावा

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्‍वरला भेट दिल्यावर सिंहस्थ कुंभमेळा व संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याचाही आढावा जाणून घेतला. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाबरोबर त्यांनी बैठक घेतली. बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर ट्रस्टला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.

Nashik District Collector Jalaj Sharma
Nashik Police Recruitment: भरतीच्या चाचणीसाठी मैदानावर CCTVचा वॉच! ग्रामीणमध्ये 28 सीसीटीव्ही; शहरात 40 हॅण्ड कॅमेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.