Nashik Police : ‘एव्हरेस्ट’ शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहक पाहत असतो. मात्र ते शक्य होतेच असे नाही. परंतु, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ४९ वर्षीय पोलीस निरीक्षक असलेल्या महिेलेने हे स्वप्न सत्यात साकरले आहे. अशी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतो आहे. (Nashik Police At age of 49 dwarka doke climbed Everest)
द्वारका विश्वनाथ डोके या महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये पोलीस निरीक्षक तथा सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. द्वारका या केसापूर (ता. राहुरी, जि. अहमदनगर) येथील मूळ रहिवाशी आहेत. २०२२ मध्ये त्यांच्या वाचनामध्ये एव्हरेस्ट मोहिमेसंदर्भात आले. तेव्हापासून त्यांना एव्हरेस्टबाबत कुतूहल निर्माण झाले. याचवेळी त्यांनी दिवंगत आई-वडिलांना श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प केला आणि त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली.
२४ मार्च २०२४ रोजी त्या काठमांडू येथे पोहोचल्या. एव्हरेस्ट शिखर सर करणारी कंपनीचे मालक लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीमेला सुरुवातही झाली. या मोहिमेत पासंग शेरपा हे द्वारका डोके यांच्यासमवेत शेवटपर्यंत सोबत होते. १७ मे रोजी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथून चढाई सुरू केली.
२२ मे रोजी पहाटेच्या ४ वाजून १० मिनिटांनी ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज, महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज हातात घेत त्याठिकाणी राष्ट्रगीत म्हटले. तसेच, जो संकल्प त्यांनी केला, त्यानुसार आई-वडिलांचा फोटो हातात घेऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत. एव्हरेस्ट मोहीम फत्ते केल्याने पोलीस दलाकडून त्यांचे कौतूक होते आहे. (latest marathi news)
अशी केली तयारी
द्वारका डोके यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प करताच, त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली. २०२३ मध्ये त्यांनी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतील मैदान व जिमचा सराव सुरू केला. एव्हरेस्ट सर करताना ज्या-ज्या शारीरिक कसरती कराव्या लागणार, त्याची तयारी त्यांनी अकादमीत केली.
मूळ गावी स्वागत
२००६ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून द्वारका डोके या रुजू झाल्या असून सध्या त्या पोलीस निरीक्षक या पदावर आहेत. २२ मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्या २३ मे रोजी सायंकाळी पाच वाजता माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचल्या. तर, त्यांच्या गावी सोमवारी (ता. २७) सकाळी सात वाजता पोहोचताच त्यांचे जंगी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.