Nashik Police : शहर पोलिसांचा टवाळखोरांना दणका! आयुक्तालय हद्दीतील 425 टवाळखोरांविरोधात कारवाई

Crime News : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली.
Police
Policeesakal
Updated on

Nashik Police : शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये,  यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये आयुक्तालय हद्दीतील ४२५ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. (Nashik Police City police crack down on thieves)

लोकसभा निवडणुकीसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली असून, येत्या ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोडही उठली आहे. तसेच, दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे, उद्यानांमध्ये रात्री-बेरात्री टवाळखोरांकडून उपद्रव करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीमध्ये टवाळखोरांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १९० टवाळखोर आणि तर, परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह चुंचाळे पोलीस चौकी या हद्दीत २३५ टवाळखोर अशा ४२५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. (latest marathi news)

Police
Nashik Women Police: निर्भया-दामिनी पथके टवाळखोरांविरोधात आक्रमक! महाविद्यालय, खासगी क्लासेसला भेट; छेडछाडी करणाऱ्यांना चोप

पोलिसांनी अचानक राबविलेल्या या कारवाईमुळे रात्रीच्यावेळी उपद्रव माजविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई गेल्या शनिवारी व रविवारी असे दोन दिवस करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांसह गुन्हेशाखेच्या पथकांनी ही कारवाई केली. यात दामिनी व निर्भया पथकांनी सहभाग घेतला होता. 

Police
Patur Crime : वाळू माफियांच्या जीवघेण्या हल्ल्यात पत्रकार जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.