Nashik News : मालेगावात पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन; कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ॲक्शन मोडवर

Nashik News : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन सुरु केले आहे.
police
policeesakal
Updated on

मालेगाव : येथे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर २६ मेस गोळीबार झाला होता. येथे गोळीबार, तलवारीने हाणामाऱ्या, चोऱ्या आदी घटना सातत्याने घडत आहेत. या संदर्भात राजकीय नेत्यांसह सामान्य नागरीकांनी पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन सुरु केले आहे. ( Police combing operation in Malegaon)

यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान पोलिसांच्या या निर्णयाचे येथे स्वागत केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. गोळीबार, चाकू, सुऱ्यांनी मारहाण, जबरी चोऱ्या, घरफोड्या, दुचाकी, मोबाईल चोरी आदी प्रकार सातत्याने होत आहेत.

या अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने व येथील अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. येथे गेल्या दहा वर्षात आर्म ॲक्ट दाखल झालेल्या गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली.(latest marathi news)

police
Nashik Lok Sabha Election : निवडणुकीचा ‘लाइव्ह’ निकाल बघा आज सिनेमागृहात!

यासाठी स्वतंत्र पथक तयार करून २८ मे पासून आर्म ॲक्ट दाखल झालेल्या ३५६ संशयित आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. कोम्बींग ऑपरेशन राबविताना यातील १६४ संशयित आरोपी हे त्यांच्या घरी मिळून आले. तसेच १४५ संशयित आरोपी घराबाहेर भेटले. संबंधितांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडे काही शस्त्रे आहेत का0 ते सध्या काय काम करतात. त्यांचे मोबाईल नंबर व त्यांची संपूर्ण माहिती पोलिसांनी जाणून घेतली.

कोम्बींग ऑपरेशन दरम्यान ९ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ९५ गुन्हेगारांवर १५१ कलम अंतर्गत तर १४५ आरोपींवर १४४ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. शहरात यापुढे कोम्बींग ऑपरेशन सुरुच राहणार असल्याचे सहाय्यक पोलिस उपअधिक्षक तेगबिरसिंह संधू यांनी येथे सांगितले.

police
Nashik Police : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविल्यास कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.