Shiv Jayanti 2023 : शिवरायांचे चरित्र समाजापर्यंत पोचवा; पोलिस आयुक्त शिंदे यांचे आवाहन

Police Commissioner Ankush Shinde speaking at the Peace Committee meeting.
Police Commissioner Ankush Shinde speaking at the Peace Committee meeting.esakal
Updated on

नाशिक : अठरापगड जाती- धर्माला एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. अशा महापुरुषांची जयंती साजरी करीत असताना मंडळांनी मिरवणुका, देखावे यातून शिवरायांचे चरित्र समाजापर्यंत पोचविले पाहिजे.

एवढेच नव्हे तर, सामाजिकतेच्या अंगाने काय करता येईल याकडेही बारकाईने पाहिले पाहिजे. जेणेकरून शिवरायांनाही त्याचा अभिमान वाटावा असा काहीतरी उपक्रम मंडळांनी राबवावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले. (Nashik Police Commissioner ankush shinde statement Shiv Jayanti 2023 rules nashik news)

पोलिस मुख्यालयाच्या भीष्मराज बाम सभागृहात आगामी शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पौर्णिमा चौघुले- श्रींगी, चंद्रकांत खांडवी, मनपाच्या उपायुक्त अर्चना तांबे, शहरातील शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्यांसह सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. दोन मुख्य मिरवणुकांसह उपनगरी परिसरात मिरवणुका निघतात. त्यासाठी लागणाऱ्या परवानगी संबंधित मंडळांनी काढून घ्याव्यात असे आवाहन केले.

या वेळी बैठकीला शांतता समिती सदस्य व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. मुख्य मिरवणुक जुन्या नाशिकमधून निघते. मात्र या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून, त्यामुळे रहदारीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते.

ही कोंडी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. ड्राय डे घोषित करावा. काही वादग्रस्त देखाव्यांबाबत परवानगी रखडल्या आहेत, त्या देण्यात याव्यात अशी स्वरूपाच्या मागण्या सागर देशमुख, रवी गायकवाड, पद्‌माकर पाटील, मामा राजवाडे, अविनाश शिंदे, ॲड. अक्षय कलंत्री, गणेश आवनकर, गजू घोडके आदी सदस्यांनी केली. उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आभार मानले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Police Commissioner Ankush Shinde speaking at the Peace Committee meeting.
SSC, HSC Exam | ‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ राबविणार : जिल्हाधिकारी गंगाथरन डी

डीजेला परवानगी नाहीच

देखाव्यामुळे रस्ता वा रहदारी अडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी, मंडळांनी स्वयंसेवक व सीसीटीव्ही यंत्रणा लावावी, नाशिकचा ढोल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेला असताना डीजेला फाटा देत ढोलच वाजवावा, असे आवाहन उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींनी यांनी केले.

मंडळांच्या परवानगीसाठी मनपाची एक खिडकी योजना आहे. ही योजना ऑनलाइन असल्याने त्यावरून मंडळांना परवानगी मिळते. मनपाकडे १९४ मंडळांचे अर्ज आले असून,त्यावर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मनपाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

युवकांच्या संधीतून सकारात्मकता

शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य पद्‌माकर पाटील यांनी शांतता समितीत युवकांच्या समावेशाचे स्वागत केले. परंतु, ज्येष्ठांना असू द्या असे म्हटले असता, आयुक्त शिंदे यांनी ज्येष्ठांच्याच मार्गदर्शनाखाली युवकांना शांतता समितीमध्ये काम करण्याची संधी आहे. याकडे सकारात्मकतेने पाहावे. तेही तुमच्याच सारखे जबाबदार नागरिक भविष्यात असतील, असे स्पष्ट केले.

तर मंडळांना पारितोषिक

जे मंडळ सामाजिकतेच्या अंगाने उपक्रम राबवतील, त्या मंडळास पोलिस आयुक्तालयाकडून पारितोषिक देऊन गौरविले जाईल, अशी माहिती आयुक्त शिंदे यांनी दिली. या पुरस्काराला काय नाव द्यायचे, याबाबत आपणच आयुक्तालयाकडे मेलच्या माध्यमातून कळविण्याचेही आवाहन आयुक्त शिंदे यांनी केले.

Police Commissioner Ankush Shinde speaking at the Peace Committee meeting.
Nashik News : 6 मिळकती BOT तत्त्वावर विकसितचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()