Nashik Police : पोलीस आयुक्तांनी घेतले ‘विठ्ठला’चे दर्शन! शहरातील पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्ताची पाहणी

Nashik News : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील पोलीस बंदोबस्ताची पाहणी करतानाच, पंचवटीतील काळाराम मंदिर व लगतच असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
Commissioner of Police Sandeep Karnik visiting Shri Vitthal Rakhumai Temple near Shri Kalaram Temple in Panchavati.
Commissioner of Police Sandeep Karnik visiting Shri Vitthal Rakhumai Temple near Shri Kalaram Temple in Panchavati.esakal
Updated on

Nashik Police : मोहरम आणि आषाढी एकादशी निमित्ताने आज शहरात पोलीसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी असल्याने अशाठिकाणीही पोलीसांचा बंदोबस्ताची सज्जता ठेवण्यात आली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील पोलीस बंदोबस्ताची पाहणी करतानाच, पंचवटीतील काळाराम मंदिर व लगतच असलेल्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. (Police Commissioner Inspection of strict police arrangements in city)

तिवंधा चौकातील बुधा हलवाई येथे भेट दिल्यानंतर खास उपवासाच्या बटाटा जिलेबीची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देताना संचालक ललित वाघ.
तिवंधा चौकातील बुधा हलवाई येथे भेट दिल्यानंतर खास उपवासाच्या बटाटा जिलेबीची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देताना संचालक ललित वाघ.esakal

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील विठ्ठल - रखुमाई मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात सकाळपासून स्थानिक भाविकांसह परराज्यातून आलेल्या भाविकांचीही गर्दी दिसून आली. याशिवाय परिसरातील विविध मंदिरांमध्ये गर्दी होती. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाणेनिहाय कडेकोट बंदोबस्त होता. अशोकस्तंभ, रविवार कारंजा, कॉलेजरोड, पंचवटीतील विठ्ठल मंदिर याठिकाणी गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता.

पोलिस आयुक्तांकडून पाहणी

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आषाढी एकादशी निमित्ताने सकाळी श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर काळाराम मंदिरालगतच असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन पूजाविधी करीत दर्शन घेतले. यावेळी शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचीही आयुक्तांनी पाहणी करीत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. (latest marathi news)

Commissioner of Police Sandeep Karnik visiting Shri Vitthal Rakhumai Temple near Shri Kalaram Temple in Panchavati.
Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; यंदा नाशिकच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

बटाटा जिलेबीची आयुक्तांना भुरळ

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने शहरातील प्रसिद्ध बुधा हलवाई येथे भेट दिली. यावेळी त्यांनी खास महाशिवरात्र आणि आषाढी-कार्तिक एकादशीनिमित्तानेच बनविण्यात येणार्या उपवासाची बटाटा जिलेबीचीही चव चाखली. यावेळी बुधा हलवाईचे नवीन पिढीचे संचालक ललित वाघ यांनी उपवासाच्या पदार्थांची माहिती दिली.

रताळ्याचा शिरा, आंब्याची बर्फी, उपवासाचा गुलाबजाम, उपवासाचा खास चिवडा, साबुदाणा वडा अशा बुधा हलवाईची खासीयत असलेल्या पदार्थांची माहिती आयुक्तांनी उत्सुकतेने घेतानाच त्याची चवही चाखली. यावेळी आयुक्तांनी बटाटा जिलेबी बनविली जात असल्याचीही प्रत्यक्ष पाहणी केली. आयुक्तांना बटाटा जिलेबीची अक्षरश: भुरळ पडली होती. यावेळी वाघ बंधुंसह पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील उपस्थित होते.

Commissioner of Police Sandeep Karnik visiting Shri Vitthal Rakhumai Temple near Shri Kalaram Temple in Panchavati.
Swayam Sai Guruji : 47 वर्षापासून दरवर्षी गुजरात ते शिर्डी उलटे चालत आहेत स्वयंसाई!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.