Nashik Police Transfer : बदल्यांनी ‘कहीं खुशी... कहीं गम’! बदल्या करून आयुक्त आठवडाभर सुट्टीवर

Nashik News : बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे ‘अर्थ’कारणच त्यांच्या बदल्यांना कारणीभूत झाल्याचे बोलले जात आहे.
Police Transfer
Police Transferesakal
Updated on

Nashik Police Transfer : शहर पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने सध्या ‘कहीं खुशी... कहीं गम’ अशी स्थिती आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बदल्यांचे आदेश जारी केल्यानंतर स्वत: आठवडाभराच्या सुट्टीवर गेले आहेत. दरम्यान, बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे ‘अर्थ’कारणच त्यांच्या बदल्यांना कारणीभूत झाल्याचे बोलले जात आहे. (Nashik police Commissioner on leave for week after transfers)

शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर, मुंबई नाका, म्हसरुळ, आडगाव, नाशिकरोड, अंबड या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या आयुक्त संदीप कर्णिक यांनी केल्या आहेत. त्याच्या या बदल्याच्या निर्णयांमुळे काही प्रभारी अधिकाऱ्यांना चपराक बसली आहे. विशेषत: गंगापूर, नाशिकरोड, म्हसरुळ या पोलीस ठाण्याच्या प्रभारींसंदर्भात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे आल्या होत्या.

त्यानंतरही आयुक्तांकडून घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीमध्ये इशारा देण्यात आला होता. परंतु तरीही काही पोलीस ठाण्याच्या प्रभारींच्या कामकाजात कोणतीही सुधारणा न दिल्याने त्याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आणि बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

आयुक्तांच्या या आदेशाने काहींना ‘लॉटरी’ लागली तरी काहींना दुय्यम पदावर काम करावे लागणार आहे. अंबडचे प्रभारी दिलीप ठाकूर यांना गंगापूर तर, मुंबई नाक्याचे प्रभारी अशोक गिरी यांच्याकडे नाशिकरोडची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तर, सुभाष ढवळे, देविदास शेळके, सोहन माछरे यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे. (latest marathi news)

Police Transfer
Arvind Kejriwal: ६ जून ते १३ जुलैदरम्यान केजरीवालांनी दिवसाला तीनवेळा 'असा' आहार घेतला; नायब राज्यपालांचं सचिवांना पत्र

एटीएसमधून आलेले सचिन खैरनार यांना आडगाव तर अतुल डहाके यांच्याकडे म्हसरुळची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अंबडचे दुय्यम निरीक्षकांकडे सध्या तात्पुरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. अजून काही अधिकारी आयुक्तालयात रुजू होणार आहेत, त्यापैकी कोणाला अंबडची जबाबदारी मिळते हे येत्या काही दिवसात समजू शकेल. तर, गंगापूरच्या प्रभारी तृप्ती सोनवणे यांना नाशिकरोडला दुय्यम अधिकारी पदावर काम करावे लागणार आहे.

नलावडे पुन्हा सातपूरला

रणजित नलावडे काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा सातपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी झाले आहेत. गेल्या वर्षी सातपूरला असताना अवघ्या काही आठवड्यात त्यांची तडकाफडकी गुन्हेशाखा व नंतर उपनगर पोलीस ठाण्यात दुय्यम पदावर बदली केली होती. मात्र, पुन्हा सातपूरची जबाबदारी देण्यात आली आहे.

Police Transfer
Nashik Police : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ताफ्यात 75 दुचाक्या सामील; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.