Nashik News : लाचप्रकरणी श्रेणी उपनिरीक्षकाला सक्तीने सेवानिवृत्तीपोलिस आयुक्तांचे आदेश

Nashik : १५ हजारांची लाचप्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाला सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी बजावले आहेत.
Bribe Crime
Bribe Crimeesakal
Updated on

Nashik News : नाशिक रोड पोलिस ठाण्यात एका गुन्ह्यात संशयिताला तपासात मदत करण्यासाठी १५ हजारांची लाचप्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाला सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी बजावले आहेत. या श्रेणी उपनिरीक्षकाविरोधात अनेक तक्रारी होत्या. तसेच कर्तव्यातही कसूर निष्पन्न झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे. गणपत महादू काकड (५७, रा. नाशिक) असे संबंधित श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांची नेमणूक नाशिक शहर मुख्यालयात होती. (Police Commissioner order to compulsorily retire range sub inspector in bribery case )

नाशिक रोड पोलिस ठाण्यात श्रेणी पोलिस उपनिरीक्षक पदावर असताना काकड यांनी ६ जुलै २०२३ रोजी पंधरा हजार रुपयांची लाच घेतली होती. पीडितेच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड पोलिसात २०२३ मध्ये विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात संशयिताला मदतीसाठी काकड यांनी १५ हजारांची लाच घेतली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काकड यांना अटक केली होती. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयाने त्यांचे निलंबन केले होते.

निलंबन कार्यकाळ पूर्ण झाल्यावर काकड यांची मुख्यालयात नियुक्ती केली होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, काकड यांच्या सक्तीने सेवानिवृत्तीचे आदेश जारी केले आहेत. काकड यांची विभागीय चौकशी करण्यात येऊन, त्यानंतर दोषारोपानुसार ही कारवाई केलेली आहे. काकड यांना या आदेशाविरोधात पुढील साठ दिवसांत पोलिस महासंचालक कार्यालयात दादही मागता येणार आहे.

Bribe Crime
Nashik News : आश्रमशाळांत पहिल्याच दिवशी गणवेश; ‘आदिवासी विकास’कडून खरेदी

कर्तव्यातही कसूर

नाशिक रोड पोलिसांत २०२३ मध्ये दाखल एका आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचाही काकड यांनी योग्य तपास न केल्याची लेखी तक्रार आयुक्तालयाकडे आलेली आहे. तसेच, काकड यांच्याकडे वरिष्ठांमार्फत पस्तीस, स्थानिकांचे तीस, आवक पंधरा असे ८० पेक्षा जास्त अर्ज चौकशीकरिता असताना, त्यांनी हे अर्ज प्रलंबित ठेवत कर्तव्यात कसूर केल्याचाही ठपका आयुक्तालयाने काकड यांच्यावर ठेवला आहे.

यांच्यावरही ‘मुख्यालया’तून कारवाई

दरम्यान, म्हसरुळ पोलिस ठाण्यातील एका अंमलदाराने २०२३ च्या नवरात्रीचा दोन दिवस बंदोबस्त केला नव्हता. तसेच, गुन्हे शाखेतील अंमलदार सहा दिवस कर्तव्यावर हजर नव्हता. याप्रकरणी मुख्यालय उपायुक्तांनी विभागीय चौकशीअंती लेखी सक्त ताकदीची शिक्षा दिली आहे. तर २०१९ मध्ये भद्रकाली पोलिस ठाण्यातील बीटमार्शल कर्तव्यावर हजर असलेल्या एका अंमलदाराने रिक्षा चालकावर कारवाई करतानाच, स्वतः:च रिक्षा चालवत आणून पोलिस ठाण्यात लावली होती.

प्रत्यक्षात बीटमार्शल कर्तव्यावरील अंमलदारास रिक्षाविरुद्ध कारवाईचे कोणतेही आदेश नव्हते. तसेच, रिक्षा चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यामार्फत कायदेशीर कारवाईही केली नाही. याप्रकरणी चौकशीअंती संबंधित अंमलदाराविरुद्ध एक वर्ष मूळ वेतनावर ठेवण्याची शिक्षा मुख्यालय उपायुक्तांनी बजावली आहे.

Bribe Crime
Nashik News : धुराळा उडवत रंगला वाहनांचा थरार! घाटात रस्त्यावर चालकांची तारांबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.