Nashik News : मालेगावात व्हावे पोलिस आयुक्तालय; गुन्हेगारी आवाक्याबाहेर

Nashik News : मालेगावच्या पूर्व भागातील दाट लोकवस्ती आणि अलीकडे शहरासह तालुक्यात घडत असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या घटना पाहता शहरातील गुन्हेगारी आता नियंत्रणाबाहेर चालल्याचे दिसत आहे.
Police
Police esakal
Updated on

मालेगाव : मालेगावच्या पूर्व भागातील दाट लोकवस्ती आणि अलीकडे शहरासह तालुक्यात घडत असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या घटना पाहता शहरातील गुन्हेगारी आता नियंत्रणाबाहेर चालल्याचे दिसत आहे. गोळीबार अन शस्त्रांनी हल्ला आता जणूकाही दररोजचाच झाला आहे अशी गेल्या महिन्याभरातील स्थिती आहे. (Police Commissionerate should be in Malegaon to control crime)

त्यामुळे भविष्यातील धोका आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी येथे पोलिस आयुक्तालयाची निर्मिती तातडीने होणे गरजेचे आहे. याबाबत यापूर्वीच आश्वासन देण्यात आलेले असले तरी हा प्रश्न पुन्हा मागे पडू नये अशी अपेक्षा सर्व सुजाण नागरिक बाळगून आहेत. आठ पोलिस ठाणे असून तालुका भागात वडनेर खाकुर्डी व मालेगाव तालुका अशी दोन पोलिस ठाणे आहेत.

याशिवाय बॉम्ब शोधक- नाशक पथक, सीआयडी, एसआयडी, गुन्हे शाखा व पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध पथक (डीबी), स्वतंत्र शहर वाहतूक शाखा कार्यरत आहेत. शहर व तालुका मिळून असलेल्या दहा पोलिस ठाण्यात अवघे दीड ते दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी आहेत.

जिल्ह्याच्या उंबरठ्यावर असलेल्या, दोन विधानसभा मतदारसंघ व दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी तसेच कायदा, सुव्यवस्थेसाठी येथे पोलिस आयुक्तालयाची व पुरेशा पोलिस बळाची आवश्‍यकता आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तालयासाठी हिरवा कंदील दर्शविला आहे. सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह भाजपचे प्रवक्ते आमदार नीतेश राणे. (latest marathi news)

Police
Nashik Lok Sabha Election : प्रत्येक मशिनचा नंबर उमेदवारांच्या मोबाईलवर; लोकसभा निवडणूक मतमोजणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने देखील शहरासाठी आयुक्तालयाची गरज व्यक्त केली आहे. यासंदर्भात वारंवार मागणीही झाली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे हा प्रश्‍न काहीसा लांबला असला तरी नजीकच्या चार महिन्यांच्या काळातील खून, गोळीबार, दरोडा, रस्तालूट यासह वाढत्या गुन्हेगारीच्या घटना व नशेखोरी, अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तालय काळाची गरज झाली आहे.

ठाण्यांची पुनर्रचना गरजेची

आयुक्तालयाची निर्मिती करतानाच शहरातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना व नवीन किमान दोन पोलिस ठाणे होणे आवश्‍यक आहे. शहराजवळील भायगाव, भायगाव नववसाहत, वैतागवाडी, वडगाव असा काही भाग वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात समाविष्ट आहे. मुळात या भागापासून पोलिस ठाणे २० किलोमीटर अंतरावर असून कॅम्प व रमजानपुरा पोलिस ठाणे मात्र अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे.

ही स्थिती पाहता पोलिस ठाणे हद्दींची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. शहरात अप्पर पोलिस अधीक्षक, तीन सहाय्यक पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. जिल्ह्याचे ठिकाण व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाचे अंतर १०५ किलोमीटर आहे. याशिवाय हद्दपार व प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांना प्रांताधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. शहरात काही मोठी

Police
Nashik Lok Sabha Constituency : दावे-प्रतिदावे, पैजा अन्‌ वादविवादात विजयाचा दावा!

दुर्घटना घडल्यास जिल्हा पोलिसांना धावत मालेगावी यावे लागते. त्याऐवजी येथे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यास ९० टक्के पश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल. पोलिसांचे मनोधैर्य उंचावेल. शहरवासीयांना निश्चितता व शांतता लाभण्यास मदत होईल.

गावठी पिस्तुलाचा सर्रास वापर

शहरात बहुसंख्य गुन्हेगार, समाजकंटक, रोडरोमिओ व गल्ली दादांकडे अवैधरीत्या गावठी पिस्तूल व शस्त्रास्त्र आहेत. शस्त्राचा धाक दाखवून लुटीच्या घटना होतात. गेल्या दोन महिन्यात गोळीबाराच्या सहा घटना घडल्या. खेळण्यातील पिस्तुलाप्रमाणे गुन्हेगार गावठी पिस्तुलाचा वापर करतात. मच्छी बाजार भागातील घटनेत थेट ९ एमएम पिस्तुलचा वापर झाला. यात युसूफ शेख ऊर्फ मुन्ना ड्रायव्हर या निरपराध तरुणाचा बळी गेला.

चार महिन्यापूर्वी इब्राहिम गांजावाला याचा खून झाला. लोकसभा निवडणूक काळातच ‘सकाळ’ने पोलिस प्रशासनाने कोम्बींग ऑपरेशन वा नाकाबंदी करून अवैध शस्त्रास्त्र हुडकून काढत गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याची गरज असल्याचे वृत्त (१२ मे) प्रसिद्ध केले होते. गुन्हेगारी कारवायांबरोबरच शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.

Police
Nashik Vaibhav Deore Case : खंडणीखोर वैभव देवरे यास सशर्त जामीन; पोलिसांची नामुष्की

गुटखा, एमडी पावडर, सट्टा, मटका, कुत्ता गोळी विक्री सर्रास सुरु आहे. पूर्व भागापाठोपाठ पश्‍चिम भागातही गुन्हेगारीचे लोन व रोडरोमिओंकडून छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. या बाबींचा अतिरेक होण्यापूर्वी पोलिसांनी खंबीर व कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

शहरातील नजीकच्या काळातील घटना

- इब्राहिम खानचा गोळी घालून खून - फेब्रुवारी

- संगमेश्‍वर मारुती चौकात गोळीबार - ६ मे

- मोहम्मद असद याच्यावर टोळक्याचा गोळीबार - ७ मे

- पिस्तुलाचा धाक दाखवून जैनुद्दीन चौकात तरुणावर हल्ला - ८ मे

- शफीक युसूफ शेख याचा गोळ्या घालून खून - ९ मे

- झोडगे शिवार पेट्रोल पंपावर गोळीबार - २५ मे

- माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार - २७ मे

Police
Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.