Nashik Police : अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी समुपदेशन; पोलिस आयुक्तांचे पोलिस ठाण्यांना आदेश

Nashik Police : गेल्या आठवड्यात उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका महिलेचा तिच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने हातोडीने मारून खून केल्याची घटना उघडकीस आली होती.
Police Commissioner Sandeep Karnik
Police Commissioner Sandeep Karnikesakal
Updated on

Nashik Police : गेल्या आठवड्यात उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका महिलेचा तिच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने हातोडीने मारून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच, सोशल मीडियाच्या नादी लागून अनेक अल्पवयीन मुले भाईगिरीचे रिल्स बनवून गुन्हेगारीच्या दिशेने जात आहेत. (Nashik Police Counseling to prevent juvenile delinquency marathi news )

अशा वाढत्या बालगुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांकडून केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय अल्पवयीन बालगुन्हेगारांची माहिती संकलित केली जात असून, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करू त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग निष्पन्न होत असून, ही बाब पोलिसांसाठी चिंताजनक आहे. तसेच काही गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांकडून पैशांचे, खाण्यापिण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर केला जात असल्याचेही पोलिस तपासातून समोर आले आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बालगुन्हेगारी रोखण्यासाठी या अल्पवयीन मुलांचे सेवाभावी संस्थांच्या मदतीने समुपदेशन करण्याचा उपक्रम लवकरच सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी पोलिस ठाणेनिहाय आणि शहर गुन्हे शाखेमार्फत शहरातील अल्पवयीन गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.

Police Commissioner Sandeep Karnik
Nashik Police : ‘पीपल ओरिएंटेड’ पोलिसिंगवर भर

त्यानुसार पोलिसांकडून लवकरच शहरातील गेल्या तीन वर्षांतील अल्पवयीन गुन्हेगारांची माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. माहिती संकलन झाल्यानंतर या अल्पवयीन गुन्हेगारांसाठी लवकरच समुपदेशनाचे वर्ग पोलिस ठाणेनिहाय घेतले जाण्याची शक्यता आहे.

विधिज्ञ व चाइल्ड वेल्फेअर

अल्पवयीन गुन्हेगार हे आमिषापोटी व जिज्ञासातून गुन्हेगारीकडे वळतात. मात्र त्यांना वेळीच मार्गदर्शन केल्यास ते गुन्हेगारीपासून परावृत्त होऊ शकतात. त्यासाठी या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विधिज्ञ आणि चाइल्ड वेल्फेअर कमिटीची मदत घेतली जाणार आहे. समुपदेशनात या मुलांना गुन्ह्यांची माहिती, त्यातून होणाऱ्या शिक्षेची जाणीव, गुन्ह्यांपासून परावृत्त करणे, तसेच या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

‘सकाळ’च्या व्यासपीठावर चर्चा

गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमांतर्गत ‘सकाळ’ कार्यालयात आले होते. त्या वेळी वाढत्या बालगुन्हेगारीसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी आयुक्त कर्णिक यांनी लवकरच यासंदर्भात सकारात्मक उपाययोजना करण्याबाबत आश्वस्त केले होते. त्यानुसार आयुक्तांनी समुपदेशनातून बालगुन्हेगारी रोखण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने पावले टाकली आहेत. (latest marathi news)

Police Commissioner Sandeep Karnik
Nashik Police : पोलिसांना चांगल्या कामाची पावती मिळावी : संदीप कर्णिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.