Nashik Police: बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! सव्वा लाखांचा दंडही केला वसुल

Traffic police taking action against reckless drivers file photo
Traffic police taking action against reckless drivers file photoesakal
Updated on

Nashik Police : रोमिओगिरी करणाऱ्या टवाळखोरांविरोधात शहर पोलिसांनी धडक कारवाई केल्यानंतर, पोलिसांनी आपला मोर्चा कर्णकर्कश हॉर्न वाजवून रॅश ड्रायव्हिंग करणारे, ट्रिपलसीटसह वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणऱ्या सुमारे सव्वा तीनशे बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. (Nashik Police crack down on unruly drivers fine of half lakh recovered)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यापासून शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून, टवाळखोरांपाठोपाठ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यामुळे टवाळखोर, रोडरोमिओ आणि वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणार्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या मंगळवारी रात्री रोडरोमिओ, टवाळखोेर, मद्यपींविरोधात कारवाई केल्यानंतर बुधवारी (ता.२९) रात्री ठराविक ठिकाणांना लक्ष्य करीत रोडरोमिओंसह बेशिस्त वाहनचालकांविरोधात मोहीम राबविली.

परिमंडळमध्ये कॉलेजरोड, आसाराम बापू पुल, अशोका मार्ग तर, परिमंडळ दोनमध्ये जेलरोड, अंबड-लिंक रोड, इंदिरानगर जाँगींग ट्रॅक याठिकाणी पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.

यात प्रामुख्याने कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, राँगसाईड ड्राईव्ह, ट्रीपलसीट, मॉडीफाईड सायलन्सर, वाहनांचे कागदपत्रे नसणे अशा वाहनचालकांकडून दंड वसुल करण्यात आला.

यात परिमंडळ एकमध्ये १५८ बेशिस्तवाहनचालकांकडून ८१ हजार रुपये तर, परिमंडळ दोनमधून १६९ बेशिस्त वाहनचालकांकडून ४० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

Traffic police taking action against reckless drivers file photo
Nashik Police: शहर पोलिसांचे ‘झिरो टॉलरन्स’ ऑपरेशन! कोंम्बिंग ऑपरेशनचा 565 टवाळखोरांना दणका

या कारवाईमध्ये पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त, पोलीस ठाण्यांच्या प्रभारींसह पोलीस अंमलदार या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

अशी झाली कारवाई

परिमंडळ १

-टवाळखोर.....६८

-बेशिस्त वाहनचालक ....१५८......८१ हजार दंड वसूल

परिमंडल-२

- टवाळखोर.....१२०

- बेशिस्त वाहनचालक.....१६९......४० हजार रु. दंड वसूल

एकूण :

-टवाळखोर....१७०

-बेशिस्तवाहनचालक.....३२७......१ लाख २१ हजार रु. दंड वसूल

Traffic police taking action against reckless drivers file photo
Nashik Police Action: टवाळखोरांची ‘रोमिओगिरी’ उतरवली; शहरात सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांचा दणका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.