नाशिक : स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुमारे एक हजारपेक्षाही अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परंतु गेल्या तीन वर्षांपासून संबंधित ठेकेदाराकडून चालढकल होत असल्याने अखेर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कानउघाडणी करताना एप्रिलअखेरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही तंबी दिली आहे. (Nashik Police Commissioner warning in CCTV case news)
२०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर नाशिक शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये नाशिक शहराची निवड झाली. त्याअंतर्गत शहरात टप्प्या-टप्प्याने एक हजारपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कार्यान्वित करण्यात येणार होते.
त्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पादवारे शहरातील सिग्नल्सवर अत्याधुनिक दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. तसेच शहरभर बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेर्यांवर नियंत्रण राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षामध्ये स्मार्ट कंट्रोल रुम सज्ज करण्यात आलेली आहे.
परंतु गेल्या तीन वर्षांपासून शहरभर सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे अद्यापही अंतिम टप्प्यात पोहोचलेले नाही. सीबीएस चौक, अशोक स्तंभ आणि मेहेर सिग्नल याठिकाणी बसविलेले सीसीटीव्ही यंत्रणा नियंत्रण कक्षाशी जोडली गेली आहे. त्यापुढे काम सरकलेले नाही.
तर, स्मार्ट सिटीअंतर्गत संबंधित ठेकेदाराकडून सातत्याने मुदतवाढ घेऊनही सीसीटीव्ही यंत्रणेची सज्जता झालेली नाही. त्यातच, सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणेची नितांत गरज शहर पोलिसांना भासणार आहे. त्याचप्रमाणे, शहरातील गुन्हेगारी, बेशिस्त वाहतूक यासंदर्भातही कारवाई करताना पोलिसांना अडचणी येत आहेत. (latest marathi news)
आयुक्तांची तंबी
गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराकडून पोलीस आयुक्तालयास दिले जात आहे. मात्र मार्चअखेरपर्यंतही ते काम होऊ शकलेले नाही. अखेर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मार्टसिटी प्रकल्प व सीसीटीव्ही ठेकेदारांची संयुक्त बैठक घेत संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी केली आहे. तसेच, एप्रिलअखेरपर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित न झाल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येऊन दुसऱ्या ठेकेदारामार्फत सदरील काम पूर्णत्वास नेले जाईल अशी तंबीच दिली आहे.
"स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आयुक्तालय हद्दीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु सतत विलंब होत असल्याने अखेर संबंधित ठेकेदाराला एप्रिलअखेरपर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत बजावले आहे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल."- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.