Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Nashik News : लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघात होणार आहे
Rashmi Shukla , Narendra Modi & Eknath Shinde
Rashmi Shukla , Narendra Modi & Eknath Shindeesakal
Updated on

Nashik Police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बुधवारी (ता. ८) अचानक नाशिकला भेट दिली. आडगाव येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पोलीस बंदोबस्तासह येत्या १५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत असून, त्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी नियोजनाबाबत समाधान व्यक्त करतानाच सूचना केल्या आहेत. (Nashik Police Director General of Police reviewed security system news)

लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघात होणार आहे. येत्या दोन आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा नाशिक, दिंडोरी मतदार संघात होणार आहेत. या काळात शहर-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच, कडेकोट पोलीस बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असणार आहे. त्यामुळे शहर-ग्रामीण पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या बुधवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या. शहर-जिल्ह्यातील निवडणुकीचा व पंतप्रधान मोदी यांच्या सभेप्रसंगीच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)

Rashmi Shukla , Narendra Modi & Eknath Shinde
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

यावेळी महासंचालकांनी निवडणुकीसंदर्भातील शहर व ग्रामीण पोलीसांचे नियोजनाची माहिती घेतली. तसेच, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांबाबतची माहिती देण्यात आली. याबाबत महासंचालकांनी समाधान व्यक्त करीत, सुरक्षा व कडेकोट पोलीस बंदोबस्तासंदर्भात सूचना केल्या.

जादा फौजफाटा दाखल

नाशिक शहर पोलिस मुख्यालयात बुधवारी (ता. ८) सायंकाळी राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या दाखल झाल्या आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या तुकड्या शहरात राहणार आहेत. यासह अतिरिक्त तीन हजार पोलिसांची कुमक येत्या काही दिवसात शहर-ग्रामीण पोलिस दलात हजर होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी एसपीजी पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. तर, येत्या १० तारखेला पंतप्रधान मोदी हे नंदूरबार येथील सभेला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवरही शहर पोलीसांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Rashmi Shukla , Narendra Modi & Eknath Shinde
Nashik Police : शहरातील महिलांच्या सुरक्षितेसाठी 38 दामिनी सज्ज! पोलीस ठाणेनिहाय दामिनी पथकाची नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.