Nashik News : शहरात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर रविवारी प्राणघातक हल्ला झाला. शहरातील सामाजिक व राजकीय संघटनांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर शाब्दिक हल्ला केला. शहरात गुन्हेगारी कारवायांना चाप बसावा, यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने. (police in Malegaon went to houses of criminals and searched them)
अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांनी सराईत गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी करत त्यांची झाडाझडती घेतली. यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील धारदार शस्त्र व साहित्य जप्त करण्यात आले. तिघे अन्य संशयित फरारी झाले.
याप्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती व सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता.२८) रात्री ते बुधवारी (ता.२९) पहाटे पाचपर्यंत शहर, आझादनगर, आयेशानगर, पवारवाडी, रमजानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी कोबिंग ऑपरेशन राबविले. (latest marathi news)
कोंबिग ऑपरेशनमध्ये पाचही पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी होते. या कोंबिग ऑपरेशनअंतर्गत शहरांतील ५७ सराईत गुन्हेगार व आर्म अक्ट गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची त्याच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. कोबिंग ऑपरेशनदरम्यान आझादनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून सराईत गुन्हेगार वखार अली अजमद अली उर्फ वखार मास्टर.
शेख सलिम शेख हबीब उर्फ सल्लु, मोहम्मद वसिम मोहम्मद सलिम उर्फ वसिम मुर्गी, यांच्यासोबत इतर ३ साथीदार हे दरोडा टाकण्याचे तयारीत होते. त्यांच्याकडून धारदार शस्त्र व साहित्य साधन जप्त करण्यात आले. हिलाल चौक परीसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन संशयित फरार आहे. या मोहिमेनंतर आगामी काळात शहरात अचानक नाकाबंदी स्किम राबविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.