Nashik Police: शहरातील सराईतांना ‘हद्दपारी’चा दणका! पोलिस आयुक्त आक्रमक; साडेतेरा महिन्यात 150 गुन्हेगारांवर कारवाई

Nashik News : आयुक्तांच्या आदेशान्वये नवीन वर्षातील गेल्या दीड महिन्यात १० सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे.
Nashik Police Commissioner Sandip Karnik
Nashik Police Commissioner Sandip Karnikesakal
Updated on

Nashik Police : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईसह कठोर कारवाईचा धडाका लावला आहे. निवडणुकांच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आयुक्त संदीप कर्णिक (Nashik Police Commissioner Sandip Karnik) यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपारीच्या कारवाईचे आदेशच दिले आहेत.

त्यानुसार दोन्ही परिमंडळ कामाला लागले असून गुन्हेगारांची माहिती संकलित करीत हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. दरम्यान, गेल्या दीड महिन्यात १० गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार केले असून, आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. (Nashik Police Commissioner marathi news)

येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असून, अशीच परिस्थिती शहरातही आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सराईत गुन्हेगारांकडून शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नुकत्याच झालेल्या आयुक्तालयाच्या गुन्हेगारीच्या आढावा बैठकीमध्ये दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात तत्काळ हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश परिमंडळ एक व दोनचे पोलिस उपायुक्तांना दिले आहेत.

आयुक्तांच्या आदेशान्वये नवीन वर्षातील गेल्या दीड महिन्यात १० सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे. यात परिमंडळ एकमधील ४ तर, परिमंडळ दोनमधील ६ गुन्हेगारांचा समावेश आहे. तसेच, गेल्या वर्षी आयुक्तालय हद्दीतून १३८ सराईत गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे.

‘राजकीय’ गुन्हेगारांवरही वक्रदृष्टी

गेल्या वर्षी राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर आयुक्तालयाने मोक्का अन्वये कारवाई केलेली आहे. तरीही काही राजकीय वरदहस्त असलेले सराईत गुन्हेगार अजूनही शहरात व्हाइट कॉलर’ बनून वावरत आहेत. शहर पोलिसांकडून अशा राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांवरही बारकाईने नजर ठेवली जात आहे. तसेच, यातील काहींवर निवडणुकीच्या तोंडावर कारवाई होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Nashik Police Commissioner Sandip Karnik
Nashik Police : पोलिसांना चांगल्या कामाची पावती मिळावी : संदीप कर्णिक

हद्दपारीची आकडेवारी

वर्ष...........हद्दपार

२०२४ (१९ फेब्रुवारीपर्यंत) ..........१०

२०२३..........१३८

२०२२..........१२७

.......

परिमंडळ.......२०२३........२०२४

झोन -१......६९......४

झोन-२.......६९......६

एकूण........१३८.....१०

"रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि गंभीर गुन्हे दाखल गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. या गुन्हेगारांविरोधात हद्दपारीची कारवाई सुरू केलेली आहे."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

Nashik Police Commissioner Sandip Karnik
Nashik Police Transfer: सोहन माछरे सातपूरचे ‘प्रभारी’! आयुक्तांची नाराजी भोवली; नलावडेंना झटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.