नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील अकार्यकारी पदावरील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत. या आदेशाविरोधात पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली असून, त्यावर येत्या आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Nashik Police Transfer marathi news)
पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १० निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक, १९ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत.
या बदल्यांच्या आदेशाविरोधात शहर आयुक्तालयातील सात-आठ पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. यातील बहुतांशी अधिकारी हे स्थानिक शहर-जिल्हा असल्याने त्यांची बदली केली आहे. तर, काहींना तीन वर्षांचा कार्यकाळ झालेला असल्याने त्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मात्र, या पोलीस निरीक्षकांच्या महिन्याभरापूर्वी बदल्या करताना अकार्यकारी पदावर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. असे असतानाही पोलीस महासंचालक कार्यालयाकडून बदल्या केल्याने काही पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये दाद मागितली आहे. यासंदर्भात येत्या आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
तिकडे मिळाली स्थगिती
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या याच पाशर्वभूमीवर बदल्या करण्यात आल्या असता, त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण नसताना बदल्या केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना मॅटने स्थगिती दिली आहे. याच निकालाच्या आधारे नाशिकच्या पोलीस निरीक्षकांनीही मॅटमध्ये धाव घेतली असून, त्यांनाही स्थगिती मिळण्याची अपेक्षा आहे.
यांच्या झाल्यात बदल्या
नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेचे नितीन पगार, बाबासाहेब दुकळे, गणेश न्याहदे, विशेष पथकाचे पंकज भालेराव, गुन्हे शाखा एकचे निरीक्षक अनिल शिंदे, अभियोग कक्षाचे राजू पाचोरकर, गुन्हे दोनचे विजय पगारे, श्रीकांत निंबाळकर या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.