Nashik Police : कराळे पुन्हा 'आयजी'चा पदभार स्वीकारणार; डॉ शेखर उद्या सेवानिवृत्त होणार

Nashik News : दोन महिन्यांपूर्वी कॅट’च्या आदेशानुसार पदउतार झालेले दत्तात्रय कराळे हे पुन्हा विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे.
Dr. B G Shekhar Patil & Dattatray Karale
Dr. B G Shekhar Patil & Dattatray Karaleesakal
Updated on

(डॉ शेखर, कराळे यांचें फोटो वापरावे)

Nashik Police : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे शनिवारी (ता. ३१) भारतीय पोलिस सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे, दोन महिन्यांपूर्वी कॅट’च्या आदेशानुसार पदउतार झालेले दत्तात्रय कराळे हे पुन्हा विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता आहे. (Nashik Police Karale will again take charge of IG)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी २०२४ ला गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यात, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांचीही बदली करण्यात आली होती. तर, दत्ता कराळे यांची डॉ शेखर यांच्या जागी बदली केली होती. कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राची पदभार स्वीकारलाही होता.

तर, डॉ शेखर यांनी कॅटमध्ये धाव घेत बदलीविरोधात दावा दाखल केला होता. या दरम्यान, डॉ शेखर यांची पुणे येथील मोटार परिवहन विभागात नियुक्ती केली. डॉ. शेखर यांनी ‘कॅट’मध्ये याचिका दाखल करताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी, तसेच मेअखेरीस निवृत्ती असतानाही बदलीचे आदेश दिल्याचे म्हटले होते. ५ मार्च रोजी ‘कॅट’ने अंतिम निर्णय देत डॉ. शेखर यांच्या बदलीस स्थगिती दिली, तसेच त्यांची पुन्हा नाशिक परिक्षेत्रात नियुक्तीचे आदेश गृह विभागला दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये डॉ. शेखर यांनी २० मार्च रोजी पदभार स्वीकारला होता. मात्र कराळे यांच्या नियुक्तीचे त्यावेळी आदेश झाले नव्हते. यामुळे डॉ. शेखर यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा कराळे यांच्याकडेच नाशिकची सूत्रे जाण्याची शक्यता आहेत. (latest marathi news)

Dr. B G Shekhar Patil & Dattatray Karale
Nashik Police Promotion : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपनिरीक्षकपदी बढती! सुखद धक्का; शहर आयुक्तालयातील 5 जणांचा समावेश

डॉ धुमाळ, मिटके यांच्यात चुरस

शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे हे शनिवारी (ता ३१) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, त्या पदासाठी सरकारवाडा विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ आणि विशेष शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्यात चुरस असल्याची चर्चा आहे. दरम्यान, डॉ कोल्हे यांनी नाशिक शहरसह ग्रामीणमध्ये सेवा बजावली असून, मैत्रेय घोटाळ्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केल्याने त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे.

Dr. B G Shekhar Patil & Dattatray Karale
Nashik Police : शहर पोलिसांचा टवाळखोरांना दणका! आयुक्तालय हद्दीतील 425 टवाळखोरांविरोधात कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.